“फुलपाखरू मित्र” प्रकल्प अंतर्गत सिंधुदुर्गात सुमारे १५० फुलपाखरांचे संवर्धन यशस्वी.

0 minutes, 2 seconds Read

 

देवगड (स्वप्नील लोके) १८ ऑगस्ट २०२४

 

“फुलपाखरू मित्र” प्रकल्प अंतर्गत सिंधुदुर्गात सुमारे १५० फुलपाखरांचे संवर्धन यशस्वी.

ज्युनिअर सायंटीस्ट, देवगड यांच्या अंतर्गत सुमारे ११ प्रजाती मधील १५० फुलपाखरांचे संवर्धन यशस्वी.

 

 

ज्युनिअर सायंटीस्ट देवगड यांच्या अंतर्गत गेली २ वर्षे फुलपाखरू मित्र हा प्रकल्प चालू होता, या प्रकल्प अंतर्गत सुमारे ११ विविध प्रजाती मधील १५० पेक्षा जास्त फुलपाखरांचे संवर्धन करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश आले आहे. या प्रकल्पात सर परशुरामभाऊ कॉलेज चा तृतीय वर्ष रसायनशास्त्र विद्यार्थी राहुल सारंग तसेच शेठ म.ग. हायस्कूल देवगड नववीचा शशांक खाडिलकर याच सोबत शिरगाव हायस्कूलचे देखील विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी होते. तसेच या प्रकल्पात देवगडच्या स्वराली गोगटे, देवगड कॉलेजचे प्राध्यापक डॉ. जाधव सर आणि डॉ. दफ्तरदार यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन
लाभले.

 

फुलपाखरे बाळगणे हा एक आगळा वेगळा छंद या वाक्याची पुरेशी जाणीव हा प्रकल्प करताना जाणवत होती, “फुलपाखरू हि कीड नसून ती निसर्गात रंग भरणी भरणारी अनमोल
देणगी आहे. बऱ्याच ठिकाणी झाडावर आलेल्या अळ्यांचा खात्मा केला जातो त्यामुळे फुलपाखरे कमी प्रमाणात तयार होतात. आणि याचा परिणाम झाडांच्या परागीकरणावर पडतो.अर्थातच फलोत्पादानावर, सुमारे ८० पेक्षा जास्त टक्के परागीकरण फक्त फुलपाखरांमुळेच होते.म्हणुनच या प्रकल्पाची सुरुवात २९ जून २०२२ पासून करण्यात आली सुरुवातीला शाळेतील मुलांना सोबत घेऊन फुलपाखरे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले गेले. त्यानंतर साहित्याची जमवाजमव करून विशेष फुलपाखरू कक्ष तयार करण्यात आले जिथे फुलपाखरे वाढू शकतील असे वातावरण तयार करण्यात आले. सोबत फुलपाखरे हि खूप हट्टी असतात.प्रत्येक फुलपाखरे हि फक्त काही विशिष्ट प्रकारच्या झाडाची पाने खाऊन जगतात. त्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या झाडांची लागवड केली गेली. प्रकल्पात सुरुवात करताना प्लेन टायगर नावाचे फुलपाखरु याची काही अंडी आणून त्यापासून सुरुवात करण्यात आली जेव्हा अंडी मग
अळी आणि मग कोश नंतर फुलपाखरू हा प्रवास पूर्ण झाला. त्यानंतरच इतर संपूर्ण प्रकल्पास
सुरुवात करण्यात आली  

तशीच हि पतंगांचे विश्व फार नवल
आहे यामुळे यावर कासार्डे कॉलेज ची अर्पिता ओतवकर पुढील संशोधन करीत आहे. सदर संशोधन हे राष्ट्रीय जीवाविग्यान केंद्र, बंगलोर यांच्या अंतर्गत चालू आहे. फुलपाखरू बाळगणे हा देखील एक छंद : अनेक लोकांना विविध प्रकारचे छंद असतात, छंद हा नेहमी मनाला भावणारा, आनंद देणारा, आणि काहीतरी शिकवून जाणारा असला
पाहिजे. त्यामुळे निसर्ग प्रेमींसाठी फुलपाखरू बाळगणे आणि त्यांचे संवर्धन करणे फार महत्वाचे आहे. यातून कण भर का होईना निसर्गास आपली मदत होते हे आपण घेतली पाहिजे.फुलपाखरू संवर्धन काळाची गरज :- वाढत्या कारखानदारीमुळे फुलपाखरांचे अस्तित्व धोख्यात आले आहे. विशेषता शेतीत वापरण्यात येणाऱ्या घातक औषधे फुलपाखरास हानिकारक ठरत आहे. हि औषधे फुलपाखरांची वाढ पूर्ण होऊ देत नाहीत त्यांच्या अळ्यांना साधीन माऊल टाकतात सामले काही पनाती हया लप्न टोण्याच्या मार्गातर भाटेत न्यासले आधीच मारून टाकतात. यामुळे काही प्रजाती या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याप्रती पावले उचलून आपणास कामाला लागले पाहिजे.परागीकरणावर टांगती तलवार आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *