गुणवंत विद्यार्थ्यांचे माध्यमिक अध्यापक संघातर्फे सत्कार सोहळा संपन्न.

0 minutes, 0 seconds Read

गुणवंत विद्यार्थ्यांचे माध्यमिक अध्यापक संघातर्फे सत्कार सोहळा संपन्न.

 

देवगड (स्वप्नील लोके)१४ जुलै २०२४

 देवगड येथील तालुका माध्यमिक अध्यापक संघातर्फे माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, माध्यमिक शाळा व शिक्षकांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम जामसंडे येथील सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मिठबाव हायस्कूलचे माझी पर्यवेक्षक आणि तालुका संघटनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र हिंदळेकर उपस्थित होते. त्याचबरोबर संघटनेचे सल्लागार नारायण माने व मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष हिराचंद तानवडे, जिल्हा समन्वयक माधव यादव देवगड बीएड कॉलेज चे माजी प्राचार्य सर्जेराव गरजे, जिल्हा मुख्याध्यापक सदस्य सुभाष दहिबावकर संघटनेचे मार्गदर्शक दिलीप कुमार फडके, तालुकाध्यक्ष प्रवीण खडपकर, कार्यवाह सिद्राम पाटील सहकार्य व शैलेश पांढरे, उपाध्यक्ष तन्मय कोठावळे, खजिनदार दत्ताराम कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर माध्यमिक शालांत परीक्षा 2024 मध्ये तालुक्यामध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक शाळेमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या परीक्षेत तालुक्यातील शंभर टक्के निकाल लागलेल्या माध्यमिक शाळांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या परीक्षेत माध्यमिक कर्मचारी पाल्यांचा देखील सत्कार झाला.
तालुक्यातील नवनियुक्त मुख्याध्यापकांचा तसेच सेवानिवृत्त शिक्षक सभासदांचा यामध्ये नारायण माने, संजीवनी फडके आणि शुभांगी बोडस यांचा सत्कार करण्यात आला. विशेष उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यामध्ये हर्ष शिवाजी कुबल, आर्या विनोद चौगुले, भार्गवी विशाल चौगुले या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त माधव यादव, एन.सी.सी. चे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणारे शिरगाव हायस्कूलचे वीरसिंग पावरा आणि सरस्वती धुरी यांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. माध्यमिक कर्मचाऱी शिष्यवृत्ती प्राप्त पाल्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी संघटनेचे मार्गदर्शक व आधारस्तंभ दिलीप कुमार फडके यांनी संघटनेसाठी रुपये 2500 देणगी दिली. तर तालुका सल्लागार नारायण माने यांनी संघटनेसाठी दरवर्षी एका दिवसाचे निवृत्ती वेतन देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना राजेंद्र हिंदळेकर यांनी संघटनेचे महत्त्व विशद केले. प्रत्येक शिक्षक सभासदाने संघटनेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. माजी प्राचार्य सर्जेराव गरजे यांनी देखील आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे निवेदन सागर कर्णिक यांनी तर आभार अश्विनी गरजे यांनी व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रवीण खडपकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका संघटनेच्या कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *