वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे माजगाव -नाईकवाडा येथे झाडाची फांदी विद्युत वाहिनीवर पडली ही घटना रविवारी दुपारी घडली. गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फ्टका ठिकठिकाणी बसला.रविवारी दुपारी अचानक माजगाव नाईकवाडा येथे झाडाची जीर्ण झालेली फांदी विद्युत वाहिनीवर पडून लोंबकळत होती. दरम्यान या प्रकरणी वीज वितरण च्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता सदरची सर्व्हिस लाईन ही ग्रामपंचायत अखत्यारीत येत असल्याचे सांगितले.त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता सोमवारी सकाळी फांदी तोडून बाजूला सारून रस्ता मोकळा करून देणार असल्याचे सांगितले.