वैभववाडी (प्रतिनिधी)
मांगवली आयरेवाडी येथील विजय अशोक आयरे या विवाहित तरुणावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान मांगवली आयरेवाडी येथील पुलानजीक घडली.
या हल्यात विजय गंभीर जखमी जखमी झाला आहे. त्याच्यावर उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन दिवसापूर्वी वैभववाडी शहरात बिबट्या आढळून आला होता. कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. बिबट्याची दहशत वैभववाडीत वाढल्याने नागरिक भयभित झाले आहेत.
