देवगड – प्रतिनिधी महाराष्ट्र दिनी १ मेला बसणार विलास साळसकर उपोषणाला ; राजकारण नव्हे, जनतेच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने देणार लढा देवगड- जामसंडे नगर पंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेचे रखडलेले काम, देवगड जामसंडे शहरासाठी पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नियोजित कोर्ले सातंडी धरण नळपाणी योजनेच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी न. पं. येणारे अपयश, […]
देवगड (प्रतिनिधी) शिरगाव देवगड क्रिकेट अकॅडमीचे व शिरगाव हायस्कूलच्या खेळाडूंची MCA इन्व्हिटेशन लीगसाठी निवड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित 16 वर्षाखालील इनव्हिटेशन लीगसाठी हायस्कूल शिरगावचे दोन खेळाडूंची निवड होऊन संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन्मान वाढला आहे. सिंधुदुर्ग टीममध्ये संकेत अजय जाधव (शिरगाव हायस्कूल) यांची निवड झाली असून, त्याचबरोबर कुणाल महेश चौकेकर (शिरगाव हायस्कूल) याची […]
देवगड (प्रतिनिधी) शिरगावचा हायस्कूल शिरगावचा विद्यार्थी कुणाल महेश चौकेकर MCA च्या वेस्ट झोन संघात शिरगाव येथील कु. कुणाल महेश चौकेकर याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित 16 वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट इन्व्हिटेशन लीगसाठी वेस्ट झोन (पश्चिम विभाग) संघात निवड झाली आहे. कुणाल शिरगाव क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू असून तो शिरगाव हायस्कूलचा विद्यार्थी आहे. […]
देवगड : प्रतिनिधी पंतप्रधान घरकुल योजनेच्या कामात गौडबंगाल नगरसेवक आक्रमक ; केंद्रीय खंडेलवाल समितीचा चुकीचा अहवाल ठेकेदाराने दिले नगरपंचायतीला पत्र देवगड न.पं.हद्दीतील पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या कामाचा विषय चांगलाच गाजला.नगरसेवक नितीन बांदेकर आणि नगरसेविका सौ.तन्वी चांदोस्कर यांनी या विषयावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.या प्रकल्पाची पाहणी करून केंद्रीय खंडेलवाल समितीने निकृष्ट काम झाले असून ते पुर्णत: […]
देवगड (प्रतिनिधी) श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे देवस्थान ट्रस्टमार्फत २ मे २०२५ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर आणि कॅन्सर पेशंट्स एड् असोसिएशन (CPAA) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ मे २०२५ रोजी श्री कुणकेश्वर मंदिर भक्तनिवास येथे सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात […]
देवगड (प्रतिनिधी) नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जामसंडे येथील पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे बांधकाम केंद्रीय खंडेवलाल समितीचे आदेश डावलून होते सुरूच ! जुन्या कामावर होत होते नवीन बांधकाम ; शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी आणून दिले मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास. देवगड जामसंडे न.पं.च्या क्षेत्रात लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आले होते मात्र त्या […]
देवगड (प्रतिनिधी) खुडी शिंदेवाडी येथील उर्मिला घाडी यांचे निधन देवगड तालुक्यातील खुडी शिंदेवाडी येथील उर्मिला महेश घाडी (५८) यांचे मंगळवारी पहाटे दीड वा. च्या सुमारास ओरोस जिल्हा रुग्णालयात निधन झाले. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला घाडी यांना हृदयविकाराचा त्रास होता. सोमवारी प्रकृती […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी हेमंतकुमार कुळकर्णी, सचिवपदी दिनेश साटम तर खजिनदारपदी महेश तेली पदी बिनविरोध निवड देवगड तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी हेमंतकुमार कुळकर्णी यांची, तर सरचिटणीसपदी दिनेश साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.उमाबाई बर्वे लायब्ररीच्या स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या विशेष सभेत देवगड तालुका पत्रकार समितीची सन २०२५-२०२७ या […]
देवगड (प्रतिनिधी) परप्रांतीय नौकेवर सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारीप्रकरणी कारवाई : नौका जप्त, मासळीचा लिलाव देवगड तालुक्यातील मुणगे येथील समुद्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारी नोकरीवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई दि. २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.३९ वाजण्याच्या सुमारास मुणगेच्या समोर अंदाजे ९-१० सागरी मैलांवर, म्हणजेच अठराव्या वाव पाण्यात, करण्यात आली. महाराष्ट्र सागरी मासेमारी (नियमन) […]
देवगड (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी श्री विलास रूमडे तर सचिव पदी गिरीश धोपटे यांची बिनविरोध निवड आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेची देवगड तालुका कार्यकारिणीची सभा दिनांक 22 मार्च 2025 रोजी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी श्री. दयानंद तेली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर सभेमध्ये श्री विलास रूमडे यांची तालुका अध्यक्षपदी तर श्री गिरीश धोपटे […]
