देवगड (प्रतिनिधी)
नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जामसंडे येथील पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे बांधकाम केंद्रीय खंडेवलाल समितीचे आदेश डावलून होते सुरूच !
जुन्या कामावर होत होते नवीन बांधकाम ; शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी आणून दिले मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास.
देवगड जामसंडे न.पं.च्या क्षेत्रात लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आले होते मात्र त्या बांधकामांवर केंद्रीय एस. के. खंडेलवाल समितीने ताशेरे ओढून ते बांधकाम पुर्णंत: निर्लेखित करावे व ९२ लाख रूपये दंड भरावा तसेच ठेकेदार बदलून पुन्हा बांधकाम करावे असे निर्देश दिलेले असताना ते डावलून जुन्या बांधकामावरच पुन्हा बांधकाम सुरू केले होते याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी न.पं.चे लक्ष वेधून दंड वसूल करून सुरू असलेले काम बंद करावे अशी मागणी केली होती त्यानंतर न.पं.प्रशासनाने काम बंद करण्याबाबत नोटीसीही दिली तरीही काम सुरू ठेवण्यात आले ही बाब साळसकर यांनी न.पं.मुख्याधिकारी यांच्यासह प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देवून निदर्शनास आणून देत जोपर्यंत या कामाबाबत खंडेलवाल समितीने दिलेल्या अहवालाची पुर्तता पुर्ण होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये अन्यथा १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा साळसकर यांनी दिला आहे.
देवगड जामसंडे न.पं.हद्दीत लाभार्थ्यांना घरे देण्यासाठी पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत घरकुल प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले मात्र हे काम चुकीच्या पध्दतीने होत असल्याचा अहवाल या बांधकामाची पाहणी केल्यानंतर केंद्रीय एस.के.खंडेलवाल समितीने दिला.कामावर ताशेरे ओढून ते काम पुर्णंत पाडून ९२ लाख रूपये दंड भरावा तसेच ठेकेदार बदलुन नव्याने बांधकाम करण्यात यावे असे निर्देश दिले होते मात्र याकडे दुर्लक्ष करून पुन्हा जुन्या कामावरच नवीन काम सुरू करण्यात आले.ही बाब शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी न.पं.प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत सुरू असलेले बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावे व दंड वसुल करून घेण्यात यावा अशी लेखी पत्राद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली होती.न.पं.प्रशासनानेही बांधकाम बंद करण्यात यावे अशी नोटीस दिली मात्र तरीही काम सुरू होते.
याबाबत साळसकर यांनी न.पं.मुख्याधिकारी सुरज कांबळे यांची भेट घेवून काम सुरू असल्याबाबत लक्ष वेधले व याबाबत कार्यवाही होत नसल्याने १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला.शनिवारी सकाळी मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्यासह जामसंडे येथे घरकुल योजनेच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी विलास साळसकर यांनी प्रत्यक्ष भेट दिली यावेळी जुन्या कामावरच नवीन बांधकाम होत असल्याचे साळसकर यांनी मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.हे काम त्वरीत बंद करण्यात यावे व खंडेलवाल समितीने दिलेल्या अहवालाची पुर्तता पुर्ण करून नंतरच कामाला सुरूवात करावी अशी मागणी केली.
लाभार्थ्यांकडून पैसे घेवून त्यांना प्रत्यक्ष घरे न देता वाऱ्यावर सोडण्यात आले या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली असून या प्रमुख विषयासह अन्य महत्वाच्या प्रश्नांबाबत चौकशी होवून कार्यवाही न झाल्यास १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे पत्र दिले आहे अशी माहिती साळसकर यांनी दिली.विलास साळसकर यांच्यासमवेत यावेळी दिपक तोरस्कर उपस्थित होते.
याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास उग्र आंदोलन छेडू अथवा वरिष्ठ स्तरावर चौकशीची मागणी करणार असल्याचे साळसकर यांनी सांगीतले.
