चिंदर पालकरवाडी लब्देवाडी तेरई रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मालवण तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

0 minutes, 0 seconds Read

आचरा-अर्जुन बापर्डेकर

चिंदर पालकरवाडी लब्देवाडी तेरई रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मालवण तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

चिंदर पालकरवाडी लब्देवाडी तेरई यासन २०१८/१९मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत या रस्त्यासाठी महाराष्ट्र दिनी १मे रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.याबाबतचे ६५लोकांच्या सह्या असलेले निवेदन तहसीलदार,आचरा पोलीस स्टेशन,चिंदर ग्रामपंचायतला दिले आहे.यात त्यांनी सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत संबंधित विभागाशी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *