श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे देवस्थान ट्रस्टमार्फत २ मे २०२५ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

0 minutes, 3 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे देवस्थान ट्रस्टमार्फत २ मे २०२५ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर आणि कॅन्सर पेशंट्स एड् असोसिएशन (CPAA) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ मे २०२५ रोजी श्री कुणकेश्वर मंदिर भक्तनिवास येथे सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कार्यालयात रविवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी सचिव हेमंत वातकर ,खजिनदार उदय पेडणेकर आदी उपस्थित होते.

या शिबिरामध्ये खालील तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडून मोफत करण्यात येणार आहेत :
१) रक्त तपासणी
२) कान, नाक व घसा तपासणी
३) रक्तदाब व फुफ्फुस तपासणी
४) स्त्रीरोग व स्तन कर्करोग तपासणी
५) सर्जिकल तपासणी व अन्य अत्यावश्यक तपासण्या

मुंबईतील महालक्ष्मी येथे मुख्यालय असलेली कॅन्सर पेशंट्स एड् असोसिएशन (CPAA) ही कर्करोग क्षेत्रात मूलभूत आणि व्यापक कार्य करणारी अग्रगण्य संस्था आहे. या शिबिराच्या माध्यमातून केवळ कर्करोगच नव्हे तर जनरल सर्जरी, कान-नाक-घसा, फिजिशियन आणि स्त्रीरोग अशा विविध शाखांचे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात सहभागी होणारे तज्ञ डॉक्टर :

जनरल सर्जन : डॉ. सतीश काणेकर

कान-नाक-घसा तज्ञ : डॉ. संजय घिल्डयाल

फिजिशियन : डॉ. विना बोरकर

स्त्रीरोग तज्ञ : डॉ. रचना मेहरा

तसेच रुग्ण समुपदेशक म्हणून CPAA च्या कार्यकारी संचालिका श्रीमती निता मोरे व सहसंचालिका श्रीमती मिनल परब यांचीही उपस्थिती राहणार आहे.

या शिबिरात प्राथमिक रक्त तपासणी तसेच स्त्रियांकरिता गर्भाशयाच्या पॅप स्मीयर तपासणी देखील केली जाणार आहे. तसेच पुढील आवश्यकतेनुसार रेडिओलॉजिकल तपासण्या मुंबई येथे विनामूल्य करण्यात येणार आहेत.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अमेय देसाई (मुंबई) व डॉ. विद्याधर तायशेट्ये (कणकवली) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

 

कुणकेश्वर पंचक्रोशीतील सर्व गरजवंतांनी या आरोग्य महायज्ञाचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *