देवगड (प्रतिनिधी)
शिरगावचा हायस्कूल शिरगावचा विद्यार्थी कुणाल महेश चौकेकर MCA च्या वेस्ट झोन संघात
शिरगाव येथील कु. कुणाल महेश चौकेकर याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित 16 वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट इन्व्हिटेशन लीगसाठी वेस्ट झोन (पश्चिम विभाग) संघात निवड झाली आहे.
कुणाल शिरगाव क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू असून तो शिरगाव हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ही निवड मिळवली आहे. क्रिकेट क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ही निवड अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून महेशच्या यशामुळे संपूर्ण शिरगाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
