देवगड (प्रतिनिधी) देवगड महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेत स.का.पाटील. महाविद्यालय संघ, मालवण प्रथम तर श्री.स. ह.केळकर महाविद्यालय संघ द्वितीय देवगड येथील श्री. स. ह.केळकर महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठ कोंकण विभाग नं.४ च्या आंतरमहाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी क्रिडा युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या क्रिडा युवा महोत्सवाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अंगी […]
देवगड : प्रतिनिधी ….. अपात्रतेची कारवाई करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार – नगरसेवक संतोष तारी देवगड जामसंडे न.पं.च्या विषय समिती निवडणुक प्रक्रियेत भाजपाप्रणित देवगड जामसंडे नगरविकास समिती गटाला सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी यांनी दिलेली मान्यता ही कायद्याला धरून नाही यामुळे न्यायालयात कायदेशीर दाद मागणार तसेच महाविकास आघाडी गटाद्वारे व्हीप बजावूनही तो डावल्याप्रकरणी उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत यांच्यावर […]
देवगड (प्रतिनीधी) तक्रारदाराच्या तक्रारी तक्रारदाराचा जबाब घेवून निकाली काढण्याचा अजब न्याय महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष अँड प्रसाद करंदीकर यांनी वेधले लक्ष महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्यावतीने जिल्ह्यातील तक्रारदार स्वतःच्या तक्रारी पोलिस ठाणे अगर वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर तक्रारीत करत असता अशा तक्रारी आपल्या कार्यालयातून संबंधीत पोलिस ठाण्याला वर्ग केल्या जातात.अशा तक्रारींवर संबंधीत पोलिस ठाण्यातून तक्रारीतील गैरअर्जदारांकडे तक्रारीतील […]
देवगड (प्रतिनीधी) अडीच वर्षांनी विषय समिती सभापती पदी भाजपची वर्णी ; देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती निवडणूक देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची व महिला बालकल्याण उपसभापती पदाची निवडणुक आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाखाली भाजपने बाजी मारली असून बांधकाम समिती सभापती पदी गटनेते शरद ठुकरुल, पाणीपुरवठा व जल:निसारण समिती सभापतीपदी […]
देवगड (प्रतिनिधी) देवगड जामसंडे नगरपंचायत विषय सभापती आज होणार निवड देवगड जामसंडे न.पं.च्या विषय समिती सभापतीपदाची आज बुधवारी होत असलेली निवडणुक महाविकास आघाडीचे गटनेते संतोष तारी यांनी या गटातील नऊही नगरसेवकांना बजावलेल्या व्हीपमुळे चर्चेत आली आहे.महाविकास आघाडीतील नगरसेवक व विद्यमान उपनगराध्यक्षा यांनी भाजपाला दिलेल्या पाठींब्यामुळे भाजपाचे संख्याबळ वाढले आहे तर उबाठाचे संख्याबळ […]
देवगड (प्रतिनिधी) रक्तदान हेच श्रेष्ठदान.. दुर्मिळ रक्तदाता राजीव पडवळ यांनी जपली माणुसकी शिक्षक विद्यार्थी घडवितो तर पत्रकार समाज घडवितो हे पुन्हा एकदा देवगड तालुका पत्रकार समितीचे सदस्य राजीव पडवळ यांनी दाखवून दिले.ए निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची गरज होती. मात्र जिल्हा रक्तपेढी येथे जाऊन देखील काही तांत्रिक कारणास्तव रक्तदान करता आले नाही.पण […]
देवगड (स्वप्नील लोके) दौड आरोग्याची, साद देवगडच्या पर्यटनाची” ; देवगडात रविवार, २९ डिसेंबर २०२४ रोजी “देवगड रन” या स्पर्धेचे आयोजन रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी, देवगड आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी “दौड आरोग्याची, साद देवगडच्या पर्यटनाची” या घोषवाक्यासह रविवार, 29 डिसेंबर 2024 […]
देवगड (प्रतिनीधी) सायली सनये हिला राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक ! ॲमेच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य, यांच्या विद्यमाने जळगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग आणि बेंच प्रेस व डेडलिस्ट स्पर्धेत ठाण्याच्या सायली समीर सनये हिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक प्राप्त केले. सदर स्पर्धेचे यजमानपद यंदा जळगाव जिल्ह्याला मिळाल्याने भुसावळच्या ‘अग्रसेन […]
कणकवली (प्रतिनीधी) संस्कृत भाषेतून नितेश राणे यांनी घेतली आमदारकीची शपथ हिंदू धर्माला,देवदेवतांना आणि हिंदू धर्म ग्रंथांना मान्य असलेल्या संस्कृत भाषेतून आमदार नितेश राणे यांनी आमदारकीची शपथ घेतली. आज विधिमंडळात झालेल्या आमदारांच्या शपथविधी वेळी नितेश राणे यांनी संस्कृत भाषेत शपथ घेऊन एक वेगळा पायंडा घातला. संस्कृत ही हिंदू धर्म धर्मग्रंथांनी स्वीकारलेली देववानी भाषा आहे. या […]
