देवगड (प्रतिनीधी)
तक्रारदाराच्या तक्रारी तक्रारदाराचा जबाब घेवून निकाली काढण्याचा अजब न्याय
महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष अँड प्रसाद करंदीकर यांनी वेधले लक्ष
महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्यावतीने जिल्ह्यातील तक्रारदार स्वतःच्या तक्रारी पोलिस ठाणे अगर वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर तक्रारीत करत असता अशा तक्रारी आपल्या कार्यालयातून संबंधीत पोलिस ठाण्याला वर्ग केल्या जातात.अशा तक्रारींवर संबंधीत पोलिस ठाण्यातून तक्रारीतील गैरअर्जदारांकडे तक्रारीतील मुद्यांच्या अनुषंगाने चौकशी करून तशी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानी स्वतः चे अहवाल वजा टिपण नोंदवून संबंधीत तक्रारदाराला कळवणे गरजेचे असून त्याबाबत त्यांनी स्वतः निर्णय घेऊन तक्रारदाराची तक्रार विचाराधीन घेण्या योग्य अथवा नाही तसेच कारवाई करण्या अथवा योग्य नाही.
याबाबतचा निष्कर्ष अथवा निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्याने मानव लोकाधिकार समितीच्या वतीने अँड प्रसाद करंजीकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनाही बाब निवेदनाद्वारे लक्षात आणून दिली आहे त्यांनी दिले या निवेदनात म्हटले आहे की ,
सद्यस्थितीत पोलिस ठाण्यामधून अशा तक्रारींवर तक्रारीत नमूद गैरअर्जदारांकडे कोणतीही चौकशी अथवा खातरजमा न करता तक्रारदारालाच बोलवून तक्रार निकाली काढण्याच्या अनुषंगाने तक्रारदाराचाच जबाब नोंद करून घेऊन तक्रारी निकाली काढण्याचे प्रकार सर्रासपणे चाललेले आमच्या सकृतदर्शनी निदर्शनास येत आहेत.
याबाबत कायद्यात स्पष्ट तरतूदी असताना देखील तसेच न्यायालयाने वेळोवेळी याबाबत मार्गदर्शक निवाडे दिलेले असताना देखील याचे पालन होताना दिसून येत नाही. तरी आपण याबाबत आपल्या वरिष्ठ अधिकारात अशा तक्रारींवर कोणत्या पद्धतीने चौकशी अथवा कार्यवाही करणे आवश्यक आहे. याचे मार्गदर्शन करणे गरजेचे बनले आहे. याबाबत आपण आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती.अशी मागणी संघटनेच्या वतीने अँड प्रसाद करंदीकर यांनी केली आहे.
