दौड आरोग्याची, साद देवगडच्या पर्यटनाची” ; देवगडात  रविवार, २९ डिसेंबर २०२४ रोजी “देवगड रन” या स्पर्धेचे आयोजन 

0 minutes, 8 seconds Read

 

देवगड (स्वप्नील लोके)

 

 

दौड आरोग्याची, साद देवगडच्या पर्यटनाची” ; देवगडात  रविवार, २९ डिसेंबर २०२४ रोजी “देवगड रन” या स्पर्धेचे आयोजन 

 

 

 

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी, देवगड आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी “दौड आरोग्याची, साद देवगडच्या पर्यटनाची” या घोषवाक्यासह रविवार, 29 डिसेंबर 2024 रोजी “देवगड रन” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

या स्पर्धेबाबत सविस्तर माहिती रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीचे सचिव गौरव पारकर आणि अनिल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

स्पर्धेसाठी 5 किमी आणि 10 किमी असे दोन गट ठेवण्यात आले आहेत. ही स्पर्धा डायमंड हॉटेल येथून सुरू होईल व तारामुंबरी बीच येथून परत डायमंड हॉटेल येथे संपेल.

 

 

सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी 22 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरावा. लिंक आयोजकांतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

 

https://forms.gle/61EHYqdzNtKjxHRK9

 

 

स्पर्धा शुल्क:

5 किमीसाठी ₹100

10 किमीसाठी ₹150

 

प्रत्येक सहभागी स्पर्धकाला टी-शर्ट दिला जाईल, तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना पदक देऊन गौरवण्यात येईल.स्पर्धेची सुरुवात सकाळी 5.30 वाजता होईल.

 

 

या पत्रकार परिषदेला रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीचे सचिव गौरव पारकर, डॉक्टर फॅटर्निटी क्लबचे सदस्य डॉ. किरण पाटणकर, रोटरी क्लबच्या सदस्य अनुश्री पारकर, अनिल गांधी, दया पाटील, नरेश डामरी, मनीषा डामरी, अनिकेत बांदिवडेकर, श्रीपाद पारकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

 

स्पर्धेसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवगडच्या पर्यटनाला प्रोत्साहन द्यावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *