देवगड जामसंडे नगरपंचायत विषय सभापती आज होणार निवड

 

 

देवगड (प्रतिनिधी)

  देवगड जामसंडे नगरपंचायत विषय सभापती आज होणार निवड

देवगड जामसंडे न.पं.च्या विषय समिती सभापतीपदाची आज बुधवारी होत असलेली निवडणुक महाविकास आघाडीचे गटनेते संतोष तारी यांनी या गटातील नऊही नगरसेवकांना बजावलेल्या व्हीपमुळे चर्चेत आली आहे.महाविकास आघाडीतील नगरसेवक व विद्यमान उपनगराध्यक्षा यांनी भाजपाला दिलेल्या पाठींब्यामुळे भाजपाचे संख्याबळ वाढले आहे तर उबाठाचे संख्याबळ हे एका नगरसेवकामुळे घटल्याने दोन्ही बाजुचे संख्याबळ समसमान झाल्याने निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

देवगड जामसंडे न.पं वर शिवसेना महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर एका वर्षातच राष्टड्ढवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत यांनी भाजपाला पाठींबा दिला तर नगराध्यक्षा साक्षी प्रभू व नगरसेवक रोहन खेडेकर यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने सत्ताधारी उबाठाचे बहुमत कमी झाले.

मात्र शिंदे गटात गेलेल्या नगराध्यक्षा व नगरसेवक यांनी आतापर्यंत गट सोडून महायुतीच्या गटात प्रवेश केलेला नाही यामुळे किमान देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये महाविकास आघाडी व महायुती यांचे पक्षीय बलाबल समसमान आहे.बुधवारी चार विषय समिती सभापतीपदांमध्ये सार्वजनिक बांधकाम, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती, पाणीपुरवठा जल:निसारण व महिला बालकल्याण समिती या समितीच्या सभापतीपदांची निवडणुक होत आहे.

या निवडणुकीत भाजपाच्यावतीने तन्वी चांदोसकर, प्रणाली माने, शरद ठुकरूल यांची नावे चर्चेत आहेत मात्र उबाठाच्यावतीने अद्यापही कोणाची नावे स्पष्ट झालेली नाही.बुधवारी होणारी निवडणुक ही समसमान संख्याबळ असल्याने टाय होण्याची शक्यता अधिक आहे मात्र बहुमताने सभापती ठरणार की चिठ्ठीद्वारे हे आज स्पष्ट होणार आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *