आचरा (अर्जुन बापर्डेकर)
चिंदर येथे 16 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर…!
संदिप भाई पारकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ चिंदर सेवा संघांचे आयोजन
चिंदर यात्रौत्सवाचे औचित्य साधून चिंदर सेवा संघ प्रतिवर्षी रक्तदान शिबीर घेत असते. चिंदर सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष कै. संदिप भाई पारकर याच्या स्मृति प्रित्यर्थ हे रक्तदान शिबीर यंदा सोमवार 16 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते 1 पर्यँत भगवती मंगल कार्यालय येथे होणार असून रक्तदान करण्यासाठी प्रकाश मेस्त्री- 8554058227, भाई तावडे-9420792990, गणेश गोगटे – 7507000599, संतोष अपराज- 9423304017, सिद्धेश गोलतकर- 7798748897 व निशांत पारकर -9049052532 यांच्याशी संपर्क साधण्याचे व रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त रक्तदात्यानी रक्ताचे पुण्यदान करावे असे आवाहन चिंदर सेवा संघाने केले आहे.
