अँड महेश राऊळ यांचा सावंतवाडी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सत्कार

    सावंतवाडी (प्रतिनीधी) अँड महेश राऊळ यांचा जाहीर सत्कार सावंतवाडी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हा आणि राज्यपातळीवरील अनेक गुन्ह्यात अडकलेल्या गुन्हेगारांना न्यायालयीन लढाईत शिक्षा देण्याचे काम करणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील आणि सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकील असणाऱ्या अँड महेश राऊळ यांचा जाहीर सत्कार सावंतवाडी तालुका पोलीस पाटील […]

नाणोस गावात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणा बाबत मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

    सावंतवाडी (प्रतिनीधी)     नाणोस गावात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणा बाबत मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर       गावातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता फोमेंतो या कंपनीने अनधिकृत रित्या सुरू केलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम दिनांक १३ डिसेंबर २०२४ च्या ग्रामसभेतील ठरावानुसार त्वरीत बंद करण्याचे आदेश संबंधित कंपनीला आदेश     सावंतवाडी तालुक्यातील […]

ऍड.कौस्तुभ मराठे यांची नोटरी पदी नियुक्ती

  देवगड (प्रतिनीधी) ऍड.कौस्तुभ मराठे यांची नोटरी पदी नियुक्ती देवगड येथील ऍड. कौस्तुभ मराठे यांची भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने नोटरी पदी नियुक्ती केली आहे . ऍड.मराठे हे देवगड येथील प्रसिद्ध दिवाणी व फौजदारी विधीज्ञ असून ते आता केंद्र सरकारद्वारा संपूर्ण देवगड विभागासाठी नोटरी म्हणून नियुक्त झाले आहेत . मागील १५ वर्षात त्यांनी अनेक […]

दुर्मिळ रक्तदाते आत्माराम शंकर सातार्डेकर (वेंगुर्ला.उभादांडा) यांनी रक्तदान करून दिले जीवदान

वेंगुर्ला (प्रतिनिधी) दुर्मिळ रक्तदाते आत्माराम शंकर सातार्डेकर (वेंगुर्ला.उभादांडा) यांनी रक्तदान करून दिले जीवदान जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे सावित्री बापू परुळेकर वय. 60(माणगाव) या पेशंटला अशक्तपणा असल्याने अत्यंत दूर्मिळ अशा एबी निगेटीव्ह रक्ताची तातडीची गरज होती आणि पेशंटचीही स्थिती गंभीर होती. अशा वेळी ताबडतोब धावून येणारे नियमित आॅन काॅल रक्तदाते आत्माराम शंकर सातार्डेकर (वेंगुर्ला.उभादांडा) यांनी पुन्हा […]

नीता राऊळ यांना कोल्हापूरचा महाराष्ट्र लोककला पुरस्कार जाहीर

  कुडाळ (मंगल कामत)       नीता राऊळ यांना कोल्हापूरचा महाराष्ट्र लोककला पुरस्कार जाहीर     तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथिल सामाजीक कार्यकर्त्या सौ. नीता राऊळ यांना कला, साहित्य, समाज, शिक्षण, अध्यात्म, संस्कृती, उद्योग, महिला, पर्यावरण, व युवक अशा विविध क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या त्यांच्या आर्दश व भरीव योगदानाबददल कोल्हापूरचा महाराष्ट्र लोककला पुरस्कार जाहीर करण्यात […]

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने लावला फेटाळून ; तळवडे ग्रामपंचायत अपहार प्रकरण 

  सावंतवाडी (प्रतिनीधी) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने लावला फेटाळून ; तळवडे ग्रामपंचायत अपहार प्रकरण  तळवडे ग्रामपंचायतच्या चौदावा पंधरा वित्त आयोग तसेच ग्रामनिधी मध्ये अपहर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले ग्राम विकास अधिकारी नामदेव तांबे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे तांबे याच्यासह अपहाराबाबत गुन्हा दाखल […]

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा ; देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

  देवगड (प्रतिनिधी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा ; देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेविषयी अधिवेशन काळात राज्यसभेत आक्षेपार्ह विधान करून महामानवाचा अवमान केला आहे. भारतीय संविधानचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच दुसरीकडे संविधानाच्या शिल्पकारचा गृहमंत्र्याकडून उघडपणे अवमान होतो आहे ही घटना […]

निवृत्त पोलीस हवालदार प्रदीप उर्फ पी.आर.सावंत यांचे निधन

  कणकवली दि २२ डिसेंबर ( प्रतिनिधी) निवृत्त पोलीस हवालदार प्रदीप उर्फ पी.आर.सावंत यांचे निधन कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द दळवी वाडी येथील निवृत्त पोलीस हवालदार प्रदीप रामचंद्र उर्फ पी.आर.सावंत (वय ६० ) यांचे अल्पशा आजाराने रविवार २२ डिसेंबर रोजी सायंकाळी निधन झाले. चिपळूण डेरवण येथे उपचारासाठी नेलेले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. परोपकारी,मनमिळाऊ स्वभावाचे प्रदीप […]

सिंधू रत्न योजनेतून दशावतार मंडळांना वाहन वाटप,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केल्या चाव्या सुपूर्त

  सिंधुदूर्गनगरी (प्रतिनीधी) सिंधू रत्न योजनेतून दशावतार मंडळांना वाहन वाटप,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केल्या चाव्या सुपूर्त सिंधुरत्न योजनेअंतर्गत सिंधुदुर्गातील नाट्यमंडळींना मंजूर झालेल्या ९ वाहनांच्या चाव्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दशावतार नाट्यमंडळांकडे सुपूर्त करण्यात आल्या. माजी मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शासनाच्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्यमंडळांना वाहन खरेदीसाठी […]

भोसले फार्मसी कॉलेजचे आविष्कार संशोधन परिषदेमध्ये यश….. ; मिहिका चव्हाणच्या प्रकल्पाला अंतिम फेरीत स्थान.

सावंतवाडी (प्रतिनीधी) भोसले फार्मसी कॉलेजचे आविष्कार संशोधन परिषदेमध्ये यश….. ; मिहिका चव्हाणच्या प्रकल्पाला अंतिम फेरीत स्थान. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या बी.फार्म व एम.फार्मच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ‘आविष्कार संशोधन परिषद २०२४’ मध्ये सहभागी होत सुयश प्राप्त केले. ही परिषद जोगेश्वरी येथील एच.के.कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित करण्यात आली होती. कॉलेजच्या एकूण ८४ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होत […]