अँड महेश राऊळ यांचा जाहीर सत्कार सावंतवाडी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीनेजाहीर सत्कार
सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हा आणि राज्यपातळीवरील अनेक गुन्ह्यात अडकलेल्या गुन्हेगारांना न्यायालयीन लढाईत शिक्षा देण्याचे काम करणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील आणि सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकील असणाऱ्या अँड महेश राऊळ यांचा जाहीर सत्कार सावंतवाडी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने करण्यात आला.
वकील महेश राऊळ यांचे माध्यमिक शिक्षण कळसुलकर स्कुल तर उच्च माध्यमिक शिक्षण पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे झाले आहे. त्यांनी गैरकृत्य करणाऱ्या अनेक शासकीय अधिका-यांना न्यायालयात योग्य म्हणने मांडून आपल्या बौद्धिक आकलनाचा अभ्यासपूर्ण आधार घेत शिक्षा दिल्या आहेत. त्यात पोलीस अधिका-यांसह,तहसिलदार ,जिल्हाधिकारी, राजकीय नेते पण सुटले नाहीत. प्रसंगी गरीब अशिलाची केस त्यांनी मोफतही लढली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पोलीस पाटील संघटनेने त्यांचा जाहीर सत्कार केला.