डिजिटल क्यू आर कोड कॅलेंडर नाविन्यपूर्ण उपक्रम : शिक्षणाधिकारी

0 minutes, 0 seconds Read

 

सावंतवाडी (प्रतिनीधी)

डिजिटल क्यू आर कोड कॅलेंडर नाविन्यपूर्ण उपक्रम : शिक्षणाधिकारी

जि.प. चौकूळ नं. ४ शाळेच्या डिजिटल कॅलेंडरचं प्रकाशन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. 4 मराठी शाळेने काढलेल्या डिजिटल क्यू आर कोड कॅलेंडर हा जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम आहे असे उद्गार जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी काढले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. 4 मराठी शाळेतील शिक्षक जावेद तांबोळी यांनी काढलेल्या डिजिटल क्यू -आर कोड कॅलेंडरच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावातील मराठीवाडी या वाडीत असलेली प्राथमिक शाळा या शाळेत नुकतेच हजर झालेले शिक्षक जावेद तांबोळी यांनी आतापर्यंत शाळेत विविध नाविण्यपुर्ण उपक्रम घेतले. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक खाजगी शाळा शाळेचे मार्केटिंग करण्यासाठी दिनदर्शिका काढतात. मात्र चौकूळमध्ये असलेल्या एका दुर्गम शाळेतील शिक्षकाने जिल्हा परिषद शाळेचे सुद्धा कॅलेंडर असले पाहिजे या भावनेने डिजिटल कॅलेंडर क्यू आर कोड असलेल्या कॅलेंडरचा उपक्रम घेत आतापर्यंत शाळेत राबवलेले सर्व उपक्रम, शाळेची, वाडीची माहिती असलेले कॅलेंडर काढले. या कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा आज शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, उपशिक्षणाधिकारी आंगणे, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सरपंच गुलाबराव गावडे, केंद्र प्रमुख आर बी गावडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर म्हणाले की, आजचे युग हे डिजिटल युग आहे. शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत पारंपरिक शिक्षण पद्धतीची जागा आता आधुनिक डिजिटल शिक्षण पद्धतीने घेतली आहे. याच डिजिटल माध्यमांचा वापर करून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक जावेद तांबोळी यांनी केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आणि नाविन्यपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, चिकित्सक वृत्तीला वाव मिळतो 21 व्या शतकातील शिक्षकांनी नाविन्याला महत्व दिले पाहिजे.

 

                 यावेळी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी उपक्रमाचे कौतुक केले. चौकूळ मधील मराठीवाडीतील या दुर्गम शाळेत राबवलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे मराठी शाळेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल यात शंका नाही. या प्रकाशन सोहळ्यास उपसरपंच लीना गावडे, केंद्र मुख्याध्यापक शीतल गावडे, ग्राम.सदस्य सुरेश शेटवे, पोलीस पाटील रवींद्र गावडे, अध्यक्ष संजू गावडे,विद्या गावडे, सायली गावडे आदी सह आंबोली चौकूळ केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *