कणकवली (प्रतिनिधी)
कणकवलीत ९ ते १२ जानेवारी पर्यंत पर्यटन महोत्सव रंगणार – समीर नलावडे
सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, पवनदीप-अरूणिता गायकांचा भव्य आर्केस्ट्रा
कणकवली शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील
पटांगणात जिल्हा भाजपच्यावतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत ‘कणकवली पर्यटन महोत्सव’ होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेते सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, नितीन कुमार यांच्यासह पवनदीप आणि अरुणिता तसेच चेतना भारद्वाज याचा भव्य ऑर्केस्ट्रा अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन तर माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे, सौ. निलम राणे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे. जिल्हा भाजपच्यावतीने हा महोत्सव होत असल्याची माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
