मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने लावला फेटाळून ; तळवडे ग्रामपंचायत अपहार प्रकरण
तळवडे ग्रामपंचायतच्या चौदावा पंधरा वित्त आयोग तसेच ग्रामनिधी मध्ये अपहर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले ग्राम विकास अधिकारी नामदेव तांबे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे तांबे याच्यासह अपहाराबाबत गुन्हा दाखल असलेल्या पाचही संशयिताना सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव यांनी केली आहे.
तळवडे ग्रामपंचायत मध्ये गतवर्षी एकूण एक कोटी 20 लाख एवढा अपहार झाल्याचा प्रकार श्री जाधव यांनी उघड करत 12 डिसेंबर 2023 रोजी त्यासंदर्भात लेखी तक्रार अर्ज प्रशासनाकडे करत चौकशीची मागणी केली होती झालेल्या चौकशीनंतर तब्बल 72 लाख 81 हजार 76 रुपये एवढा अपहार झाल्याचे चौकशीतून सिद्ध झाले होते या प्रकरणे ग्रामविकास अधिकारी नामदेव तांबे यांच्यासह सरपंच तसेच दोन ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये श्री तांबे हे मुख्य संशयित आरोपी होते. मात्र गुन्हा दाखल होऊनही आजपर्यंत संबंधित संशयित यांना अटक झाली नसून ते मोकाट आहेत एकूणच गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री तांबे यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयाकडे धाव घेत अर्ज दाखल केला होता परंतु न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता यावेळी त्यांनी न्यायालयाकडे आपण या प्रकरणात दोषी नसून सरपंच व गटविकास अधिकारी यामध्ये असल्याचा आरोप करत तशा प्रकारचे खोटे म्हणणे त्यांनी न्यायालयाकडे सादर केले होते परंतु सदरची माहिती न्यायालयाने फेटाळून लावत अटकपूर्व जामीनही नामंजूर केला आता सावंतवाडी पोलिसांनी संबंधित श्री तांबे यांना तात्काळ अटक करून अन्य आरोपींनाही अटक करावे अशी मागणी श्री जाधव यांनी पत्रकार परिषद केली यावेळी त्यांच्यासोबत माजी सरपंच विजय रेडकर तसेच सामाजिक कार्यकर्ते उत्तम परब उपस्थित होते.