कुणकेश्वर यात्रा कालावधीत चिरे वाहतूक बंद तहसीलदारांनी दिल्या व्यावसायिकांना सूचना

देवगड (प्रतिनिधी)

कुणकेश्वर यात्रा कालावधीत चिरे वाहतूक बंद तहसीलदारांनी दिल्या व्यावसायिकांना सूचना

        कुणकेश्‍वर यात्रा कालावधीत चिरेखाण व्‍यवसाय व चिरेवाहतूक बंद ठेवण्‍याबाबत तसहसीलदार रमेश पवार यांचेकडून देवगड तालुक्‍यातील चिरेखाण व्‍यवसायीक यांना सुचना देण्‍यात आली आहे.
       कोकणची काशी म्‍हणून सर्व दुर ख्‍याती असलेल्‍या  कुणकेश्‍वर महाशिवरात्री यात्रेला महाराष्‍ट्र राज्‍य  व नजिकच्‍या राज्‍यातून अनेक भाविक भक्‍त येत असतात. श्रीदेव कुणकेश्‍वर  यात्रा दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२५ यादिवशी होणार आहे.
दुस-या दिवशी पहाटेपासून पवित्र स्‍नान सुरू होणार आहे.त्यामुळे २६ फेब्रुवारी ते  २८ फेब्रुवारी या कालावधीत भाविकांना कुणकेश्‍वर यात्रेस्‍थळी येता जाता कोणतीही अडचण होवू नये  व वाहतूक मार्गात अडचण येवू नये याची खबरदारी घेत तहसीलदार रमेश पवार यांनी आपल्‍या दालनात चिरेखाण व्यवसायिकांची बैठक घेवून 26 ते 28  फेब्रुवारी 2025 या कालावधीत तीन दिवस चिरेखाण व्‍यवसाय व चिरेवाहतूक बंद ठेवण्‍याबाबत सुचना दिली आहे. यावेळी देवगड मधील चिरेखाण व्‍यवसायीक, नायब तहसिदार विवेक शेठ,श्रीकृष्‍ण ठाकूर व संजय गांधी शाखेचे नायब तहसीलदार सुरेंद्र कांबळे उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *