देवगड संजय गांधी निराधार योजना समिती बैठकीत ७१ नवीन प्रकरणे मंजूर

0 minutes, 0 seconds Read

देवगड संजय गांधी निराधार योजना समिती बैठकीत ७१ नवीन प्रकरणे मंजूर

 

देवगड (प्रतिनिधी)दि.२२ जुलै २०२४

 

देवगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक अध्‍यक्ष संतोष किंजवडेकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व देवगड तहसीलदार संकेत यमगर यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तहसील कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत एकूण ७१ नवीन प्रकरणे मंजूर करण्यात आली.अशी माहिती अध्यक्ष किंजवडेकर यांनी दिली .

या नव्याने मंजूर झालेल्या प्रकरणांमध्ये संजय गांधी विधवा लाभार्थी यांचे २७ प्रस्‍ताव, परितक्‍त्‍या ०१,अविवाहित ०१, दिव्‍यांग २४,अनाथ ०१, श्रावणबाळ ११ व वृध्‍दापकाळ ०६ अशी एकूण ७१ नवीन प्रकरणे मंजूर करण्‍यात आली.

यावेळी समिती सदस्‍य वैभव करंगुटकर, सुहास राणे, शैलेश लोके,संतोष जंगले,संजना आळवे,न.पं . मुख्‍याधिकारी सुरज कांबळे,नायब तहसिलदार श्रीकृष्‍ण ठाकूर कैलास गावडे, शिवराज चव्‍हाण,
महसूल सहाय्यक प्रदिप कदम, प्राजक्‍ता चिंदरकर आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *