सावंतवाडी (प्रतिनिधी) २२ जुलै २०२४
सावंतवाडी जुना शिरोडा मुख्य मार्गावर कोसळला कल्पवृक्ष
सावंतवाडी शहरातील जुना शिरोडा नाका येथे मुख्य मार्गालगत असलेला नारळाचे झाड उन्हाळून रस्त्यावर पडल्याने विद्युत वाहिन्यावर पडल्याने विद्युत भारितवाहिन्यांसह लगतच असलेला विजेचा खांबही रस्त्यावर पडला. सुदैवाने या घटने वेळी कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी तसेच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून विद्युत खांब तसेच विद्युत वाहिन्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सदरचा माड व विद्युत काम रस्त्यावरच आडवा असल्याने दोन्ही बाजूला वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. सदरची वाहने पर्यायी मार्गाने मार्गस्थ केली जात आहेत. दोन्ही बाजूने एसटी बसेस देखील अडकल्या असून त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत.
