रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा दिला इशारा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला हायरिस्क गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन तिला गोवा-बांबुळी रुग्णालयात हलविले. तसेच कर्करोग असलेल्या एका रुग्णाला तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत छत्रपती संभाजीनगरला पाठविण्यात आले. त्यामुळे रुग्णांची हेळसांड झाली. […]
कणकवली (तुळशीदास कुडतरकर) कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा ३३ वा मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सव ३ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित केला आहे. रंगभुमीवरील दिग्गज कलाकारांची उपस्थिती या नाट्य महोत्सवाला लाभणार आहे. आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ही संस्था कणकवली सारख्या छोटयाशा निमशहरी भागात गेली ४८ वर्षे नाथ पै एकांकिका स्पर्धा, […]
देवगड ( प्रतिनिधी) जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ च्या निवडणुक प्रक्रियेला शुक्रवारपासुन सुरूवात झाली.मात्र दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला असून शनिवारी दुसऱ्या दिवशी एकूण ७ अर्ज इच्छुक उमेदवारांना वितरीत करण्यात आले.दोन दिवसात एकूण १६ अर्ज इच्छुक उमेदवारांना वितरीत करण्यात आले आहेत.दुसऱ्या दिवशी सर्वाधिक ४ अर्ज भाजपा पक्षाकडून घेण्यात […]
कणकवलीतील मुलांचा इंटीरियर व फॅशन डिझाईनचा अनोखा प्रवास-उपगरध्यक्ष सुशांत नाईक कणकवली (तुळशीदास कुडतरकर) फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग यांच्या “आरंभ प्रदर्शन -२०२६” चा शुभारंभ कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, अनंत पिळणकर, कवी-लेखक-निवेदक निलेश पवार, फ्लोरेट कॉलेजच्या संचालिका आस्था कदम, कदम सर, आर्या बिडये, आदी […]
भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन मुंबई (प्रतिनिधी) राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता खेचून […]
आचरा (अर्जुन बापर्डेकर) सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ या भौगोलिक घटनेच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद अनुभवत गणितातील चौरस आणि त्याच्याशी संबंधित लांबी, रुंदी यांचे मापन परिमिती, क्षेत्रफळ आणि काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म आनंददायी पद्धतीने अभ्यासले. या महोत्सवाच्या आयोजना मागे गणित सारख्या विषयातील निरसता कमी करून त्या विषयातील क्लिष्ट संकल्पना रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना आत्मसात करता याव्यात […]
खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येते महानगरपालिकेच्या विजयाचा आज जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यात असंच महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अशा युतीच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्यात आली याचा जल्लोष […]
सावंतवाडी (प्रतिनिधी) ग्रंथालय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा वेंगुर्ले नगर वाचनालयाचा स्व.श्रीकृष्ण सखाराम सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार श्री.आनंद महादेव देवळी मळगाव ग्रंथपाल कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव ता.सावंतवाडी यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरुप शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रु.५,००० असे आहे.पुरस्काराचे वितरण रविवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रो.डॉ.धनराज […]
आचरा(अर्जुन बापर्डेकर) नाही पुस्तक नाही शाळा निसर्गाच्या सानिध्यात हवे तेवढे खेळा म्हणत तोंडवळी येथील समुद्र किनारी केंद्र शाळा आचरे नं 1च्या मुलांनी एक दिवस रमत निसर्गाचा आनंद घेतला.यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, व्यावसायिक महेश राणे आदींनी भेट देत मुलांचा उत्साह वाढविला. केंद्र शाळा आचरे नं 1विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच अवांतर ज्ञान वृद्धि साठी […]
कणकवली (प्रतिनिधी) राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुतीतूनच लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी -सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे यांनी दिली. कणकवली […]
