देवगड ( प्रतिनिधी)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक २०२६ च्या निवडणुक प्रक्रियेला शुक्रवारपासुन सुरूवात झाली.मात्र दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला असून शनिवारी दुसऱ्या दिवशी एकूण ७ अर्ज इच्छुक उमेदवारांना वितरीत करण्यात आले.दोन दिवसात एकूण १६ अर्ज इच्छुक उमेदवारांना वितरीत करण्यात आले आहेत.दुसऱ्या दिवशी सर्वाधिक ४ अर्ज भाजपा पक्षाकडून घेण्यात आले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरूवात झाली असून देवगड तालुक्यातील ७ जि.प. गट व १४ पं.स गणांसाठी निवडणुक होणार आहे.शुक्रवारपासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रक्रियेला सुरूवात झाली.देवगड तहसिल कार्यालयात तहसलिदार यांच्या दालनात निवडणुक कक्ष सुरू करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी ९ जणांना उमेदवारी अर्ज वितरीत करण्यात आले यामध्ये जि.प.गटासाठी ठाकरे शिवसेनेकडून ४ व पंचायत समिती गणासाठी १ असे एकूण ५ अर्ज, भाजपाकडून जि.प.साठी १ व पं.स.साठी १ असे २ अर्ज तसेच अपक्ष जि.प.गटासाठी १ व पंचायत समितीसाठी १ असे २ अर्ज देण्यात आले मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता तर दुसऱ्या दिवशी भाजपा पक्षाकडून पं.स.गणासाठी २ व जि.प.गटासाठी २ असे ४ अर्ज घेण्यात आले.
अपक्ष उमेदवारांनी पंचायत समिती गणासाठी १ व जि.प.गटासाठी २ उमेदवारी अर्ज घेतले.यामुळे शनिवारी ७ इच्छुक उमेदवारांना अर्ज वितरीत करण्यात आले.मात्र दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
