आनंद देवळी यांना वेंगुर्लेनगर वाचनालयाचा पुरस्कार जाहिर

सावंतवाडी (प्रतिनिधी)

 

ग्रंथालय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा वेंगुर्ले नगर वाचनालयाचा स्व.श्रीकृष्ण सखाराम सौदागर स्मृती आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार श्री.आनंद महादेव देवळी मळगाव ग्रंथपाल कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव ता.सावंतवाडी यांना जाहीर झाला आहे.

 

पुरस्काराचे स्वरुप शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रु.५,००० असे आहे.पुरस्काराचे वितरण रविवारी १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रो.डॉ.धनराज बा.गोस्वामी प्राचार्य बॅ.बाबासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले यांच्या हस्ते नगर वाचनालयाच्या लक्ष्मीबाई कोरगावकर सभागृहात होणार आहे.

 

अलिकडे सावंतवाडी येथे संपन्न येथे झालेल्या पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २०२५ मध्ये ग्रंथपाल म्हणून केलेल्या कार्याची जिल्हास्तरावर दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले आहे.मळगाव पंचक्रोशीमध्ये नावाजलेल्या परिमल कला आणि क्रिडा मंडळाचे कार्यवाह म्हणून आपल्या कार्यकाळात एकांकिका महोत्सव,एकांकिका स्पर्धा तसेच जिल्हा स्तरावरील कबड्डी हॉलिबॉल क्रिकेट, कॅरम बुध्दीबळ आदी खेळाचे यशस्वी आयोजन करून कला आणि क्रिडा चळवळीसाठी विशेष योगदान दिलेले आहे.

 

सांस्कृतिक चळवळी बरोबरच ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून मळगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत.त्यांनी गावाचे उपसरपंच पद भूषविले आहे.ते सलग पाचवेळा ग्रामपंचायतीचा निवडणुकीत निवडून आलेले आहेत.आपल्या सदस्य काळात मळगाव गाव महाराष्ट्र राज्यात स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकावर आलेला आहे.त्यात त्यांच विशेष योगदान राहिलेले आहे.

 

तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव निर्मल ग्राम पर्यावरणात संतुलित ग्राम,स्मार्ट ग्राम पुरस्कार आदी पुरस्कार त्यांच्या काळात ग्रामपंचायतीला लाभलेले आहेत.त्यांना यापूर्वी जिल्हा ग्रंथालय संघाचा आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कार तसेच अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखन फेलोशिप मानकरी पुरस्काराने गौरविलेले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *