इळये वरंडवाडी येथील बेपत्ता २८ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला

इळये वरंडवाडी येथील बेपत्ता २८ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला देवगड (प्रतिनिधी)१८ जुलै २०२४   इळये वरंडवाडी येथील बेपत्ता किरण मंगेश सावंत (२८) या युवकाचा मृतदेह तेथील प्राथमिक शाळेच्या ओहोळात बुधवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास आढळून आला. किरण या १४ जुलैपासून बेपत्ता होता. चार दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक […]

व्यसनमुक्तीची वारी, विठ्ठलाच्या दारी ; नशाबंदी मंडळाचा अनोखा उपक्रम

व्यसनमुक्तीची वारी, विठ्ठलाच्या दारी ; नशाबंदी मंडळाचा अनोखा उपक्रम     देवगड (प्रतिनिधी) १८ जुलै २०२४   आपल्या समाजावर संताच्या विचार धारेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. म्हणूनच तर दरवर्षी लाखो भक्तगण संत अभंग गात पंढरीची वारी करतात. त्यात कीत्येकजण वारीत गळ्यात तुळशीची माळ घालून व्यसनमुक्त राहण्याचा संकल्पही करतात.हाच हेतू लक्षात घेऊन नशाबंदी मंडळ आणि […]

महाळुंगे येथे चक्रीवादळामुळे घराचे छप्पर उडून 23 हजार सहाशेचे नुकसान ; देवगडात तालुक्यात ९० मिमी पाऊस

महाळुंगे येथे चक्रीवादळामुळे घराचे छप्पर उडून 23 हजार सहाशेचे नुकसान ; देवगडात तालुक्यात ९० मिमी पाऊस देवगड (प्रतिनिधी)१८ जुलै २०२४ देवगड तालुक्यात पावसाची संंतप्तधार ही सुरूच आहे. गुरुवारी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी किरकोळ पडझड झाली आहे. महाळुंगे येथील दशरथ रामचंद्र देवळेकर यांच्या घराच्या छपराचे सिमेंट पत्रे उडून गेल्याने सुमारे 23 हजार 600 रुपयांचे […]

लोप पावलेली नाट्यकला जिवंत ठेवण्यासाठी लवकरच नाट्यमहोत्सवाचे आयोजन – अँड सिद्धेश माणगावकर

देवगड (स्वप्नील लोके) १८  जुलै २०२४   लोप पावलेली नाट्यकला जिवंत ठेवण्यासाठी लवकरच नाट्यमहोत्सवाचे आयोजन – अँड सिद्धेश माणगावकर देवगड युथ फोरम संस्थेच्या वतीने केले जाणार आयोजन युथ फोरम देवगड संस्थेच्या माध्यमातून देवगड मध्ये काळानुरुप लुप्त झालेली नाट्य कला पुन्हा जिवंत करण्यासाठी लवकरच नाट्य महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन देवगड युथ फोरम संस्थेचे अध्यक्ष अँड […]

प्रलंबित विकासकामांच्या पूर्ततेकरिता 15 ऑगस्ट रोजी उपोषण ; सतत पाठपुरावा करूनही कार्यारंभ आदेश होत नसल्याने उपोषणाचा निर्णय – गुरु कल्याणकर

बांदा (मंगल कामत) १६ जुलै २०२४   प्रलंबित विकासकामांच्या पूर्ततेकरिता 15 ऑगस्ट रोजी उपोषण ; सतत पाठपुरावा करूनही कार्यारंभ आदेश होत नसल्याने उपोषणाचा निर्णय – गुरु कल्याणकर   बांदा शहरातील मंजूर विकास कामांचा दोन वर्षे उलटूनही अंदाजपत्रक, कार्यारंभ आदेश न झाल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांनी मा.कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांना १५ […]

इळये वरंडवाडी येथील युवक बेपत्ता

इळये वरंडवाडी येथील युवक बेपत्ता   देवगड:प्रतिनिधी   इळये वरंडवाडी येथिल किरण मंगेश सावंत(२८) हा युवक बेपत्ता झाला आहे.याबाबतची तक्रार त्याचा आईने देवगड पोलिस स्थानकात दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, इळये वरंडवाडी येथील किरण मंगेश सावंत हा युवक दि. १४ जुलै रोजी सकाळी ८ वा.सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता निघुन गेला. नातेवाईक, आजुबाजुच्या […]

देवगड तालुक्यातील विठ्ठल मंदिरात उद्या आषाढी एकादशी उत्सव

देवगड तालुक्यातील विठ्ठल मंदिरात उद्या आषाढी एकादशी उत्सव   देवगड (प्रतिनिधी)१६ जुलै २०२४   आषाढी एकादशी उत्सवानिमित्त देवगड तालुक्यातील ठिकठिकाणीच्या विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे ४ वाजता पाद्यपूजा,५ ते ६:३० काकड आरती,भाविकांना दर्शनास प्रारंभ,सकाळी ९ घटस्थापना व हरिनामाचा गजर,सायंकाळी ४ ते ५:३० तारामुंबरी […]

देवगडात तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुमारे दोन लाखाचे नुकसान ; १६७ मिमी पाऊस

देवगडात तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुमारे दोन लाखाचे नुकसान ; १६७ मिमी पाऊस देवगड(प्रतिनिधी)१६ जुलै २०२४ देवगड तालुक्यात पावसाची संंतप्तधार ही सुरूच असून मंगळवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पडझड होऊन तालुक्यात सुमारे २ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात १६७ मीमी इतक्या पावसाची नोंद असून आतापर्यंत तालुक्यात १८६२ मिमी इतकी नोंद आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील आडबंदर […]

शिरगाव महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या ५७ वा आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सव संपन्न

शिरगाव महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या ५७ वा आंतरमहाविद्यालयीन विभागीय युवा महोत्सव संपन्न   देवगड (प्रतिनिधी)१६ जुलै २०२४   युवा महोत्सव हे विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्याचे प्रमुख केंद्र आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावे यांनी युवा महोत्सवा दरम्यान केले. पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय शिरगाव येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या ५७ आंतरमहाविद्यालयीन विभागीय […]

देवगडात तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६० हजाराचे नुकसान ; १७१ मिमी पाऊस ; मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

देवगडात तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६० हजाराचे नुकसान ; १७१ मिमी पाऊस ; मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत देवगड(प्रतिनिधी) १५ जुलै २०२४   देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीने ठीकठिकाणी पडझड होऊन सुमारे 60 हजाराचे नुकसान झाले आहे. तालुक्यात पावसाची संंतप्तधार ही सुरूच आहे.सलग दोन-तीन दिवस कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देवगड तालुक्यात […]