देवगड (प्रतिनिधी) विनयभंग केल्याप्रकरणी कोर्ले येथील दोन्ही संशयितांविरुद्ध विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल कोर्ले खानविलकरवाडी येथील एका युवतीला धमकी देत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कोर्ले सरपंच विश्वनाथ विष्णू खानविलकर व भूषण भरत खानविलकर या दोन्ही संशयितांविरुद्ध विजयदुर्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २ मार्च रोजी सायंकाळी ४ वा. च्या सुमारास घडली. […]
देवगड- प्रतिनिधी शुल्लक कारणावरून धारदार सुऱ्याने जीवघेणा हल्ला ;सौंदाळे हेळदेवाडी येथील घटना सौंदाळे हेळदेवाडी येथील मेघराज जयराम नार्वेकर (वय ४०) यांच्यावर त्यांच्या घरातच धारदार सुऱ्याने जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी तेथील अनिल एकनाथ नार्वेकर (वय ६५, रा. सौंदाळे हेळदेवाडी) या संशयितावर विजयदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. […]
देवगड(प्रतिनिधी) शेठ म.ग.हायस्कुल माजी विद्यार्थी ४२ वर्षाच्या मैत्रीचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ! देवगड येथील शेठ मफतलाल गगलबाई हायस्कूल च्या १९८३ एसएससी बॅचचा निवासी ४२ वर्षांच्या अतूट मैत्रीचा स्नेहमेळावा ४ वर्धापन दिन सोहळा कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील कोकण हेरिटेज या रिसॉर्ट मध्ये उत्साहात संपन्न झाला.यात ९ वर्ग मैत्रिणी आणि १६ वर्गमित्र एकूण २५ जणांनी सहभाग […]
देवगड (प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय व प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये “स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष” स्थापन ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी उपाय व सुविधा पुरविणे, राज्यघटनादत्त वृध्दांचे हक्क अबाधित ठेवणे. वृध्दांची आर्थिक सुरक्षितता, आरोग्य,पोषण मुल्य,निवारा,शिक्षण, कल्याणकारी जीवन जगता यावे. यास्तव त्यांच्या जीवीताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे, ज्येष्ठ नागरिकांचा विविध स्तरातून होणारा छळ, पिळवणूक यापासून त्यांचे […]
देवगड : प्रतिनिधी देवगड जामसंडे शहराचा प्रारूप विकास आराखड्यात लोट्स गार्डन हा नाविन्यपुर्ण प्रकल्प ; शहराचा प्रारूप विकास आराखडा न.पं.सभेत सादर,विकास आराखड्यात २७ नवीन आरक्षणे देवगड जामसंडे शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात २७ नवीन आरक्षणे दर्शविण्यात आली असून न.पं.च्या विशेष सर्वसाधारण सभेत शहराचा हा प्रारूप विकास आराखडा सादर करण्यात आला.आराखड्यामध्ये दलदलीच्या ठिकाणी लोट्स गार्डन हा […]
देवगड (प्रतिनिधी) महाशिवरात्री यात्राउत्सव नंतर कुणकेश्वर मंदिर परिसराची डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, तर्फे केली स्वच्छता डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांनी आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.वाढत्या प्रदूषणाला आळा घालुन पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करून ऐतिहासिक वारसा जपणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी आदरणीय डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा […]
देवगड/ प्रतिनिधी शिंपले (मुळे) काढण्यासाठी गलेल्या (४५) वर्षीय मच्छिमाराचा तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मृत्यू तारामुंबरी मुरमणेवाडा येथील संतोष तुकाराम सारंग (४५) या मच्छिमाराचा तारामुंबरी खाडीपात्रात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मिठमुंबरी बागवाडी येथील नस्ताच्या ठिकाणी पाण्यात तरंगताना आढळून आला. ही घटना रविवारी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष […]
देवगड (प्रतिनिधी) पोस्टल खाती उघडण्यात जिल्ह्यात देवगड प्रथम तर गोवा रिजनमध्ये द्वितीय चालू आर्थिक वर्षात देवगड पोस्टल उपविभाग नवीन खाते उघडण्यात प्रथम चालू आर्थिक वर्षात देवगड पोस्टल उपविभागात देवगड, कणकवली व वैभववाडी तालुक्यात गावागावात डाक मेळावे आयोजित करून देवगड उपविभाग बचत खाती उघडण्यासाठी जिल्हयात प्रथम क्रमांकावर आहे तसेच गोवा रिजन मध्ये द्वितीय क्रमांकावर आहे. […]
आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा येथे वन विभागातर्फे माकड पकड मोहीम -ग्रामस्थांमधून समाधान आचरा गावात माकडांचा उपद्रव वाढला आहे.शेती बागायती,नारळ फोफळी तसेच इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे.लाल तोंडाच्या माकडांचा तर घरात घुसून केलेले जेवण फस्त करण्यापर्यंत मजल गेली होती.यामुळे ग्रामस्थांमधून माकड पकड मोहीम आचरे गावात राबविण्याची मागणी केली जात होती.याची दखल घेत […]
देवगड (प्रतिनिधी) घरासमोर उभी करून ठेवलेली मोटरसायकल चोरीस ; तळेबाजार येथील घटना घरासमोरील गेटबाहेर उभी करून ठेवलेली हिरो कंपनीची डीलक्स मोटरसायकल अज्ञाताने चोरी केल्याची फिर्याद ओंकार प्रदीप तावडे (३४, रा. तळेबाजार साईनगर) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना […]
