शेठ म.ग.हायस्कुल माजी विद्यार्थी ४२ वर्षाच्या मैत्रीचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न !

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड(प्रतिनिधी)

शेठ म.ग.हायस्कुल माजी विद्यार्थी ४२ वर्षाच्या मैत्रीचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न !

देवगड येथील शेठ मफतलाल गगलबाई हायस्कूल च्या १९८३ एसएससी बॅचचा निवासी ४२ वर्षांच्या अतूट मैत्रीचा स्नेहमेळावा ४ वर्धापन दिन सोहळा कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील कोकण हेरिटेज या रिसॉर्ट मध्ये उत्साहात संपन्न झाला.यात ९ वर्ग मैत्रिणी आणि १६ वर्गमित्र एकूण २५ जणांनी सहभाग घेतला.आणि आपल्या ४२ वर्षाची अतूट मैत्रीचा आदर्श समाजासमोर ठेवत असताना .या मैत्रीचा ४ वर्धापन दिन आदर्श विद्यार्थी आणि प्रतिथंयश आंबा बागायतदार प्रदीप पाटणकर यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.

आपल्या नोकरी व्यवसाय च्या निमित्ताने विविध क्षेत्रात सेवा बजाविणारे ,सेवानिवृत्त पोलीस,अधिकारी,,आरोग्य विभाग ,खेळाडू,मच्छिमार,व्यापारी ,पत्रकार ,गृहिणी या क्षेत्रातील वर्ग मित्र मैत्रिणी यात सहभागी होत्या.प्रवासात आणि स्नेहमेळाव्यात मित्र मैत्रिणी च्या विविध खाद्यप्रदार्थ यांची चव घेत रिसॉर्ट वरील सुग्रास शाकाहारी नाश्ता शाकाहारी,मांसाहारी,मच्छी जेवणाचा आस्वाद घेतला आणि नव्या जुन्या आठवणींना उजाळा देत दोन दिवस हा स्नेह मेळावा आनंदाने आणि उत्साहाने पार पाडला.

दिवसभर विविध मनोरंजनाचे खेळ,संगीत नृत्य ,जलतरण तलावातील मौजमजा ,तसेच रात्रीच्या शीतल चांदण्यात कराओके गीत संगीत,नृत्य,अंताक्षरी मधील मित्र मैत्रिणीची जुगलबंदी काही औरच होती.रांची (झारखंड), मुंबई, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्ग मित्र मैत्रिणी यांनी सहभाग घेत हा स्नेहमेळावा यशस्वी होत असताना मुळदे ता.कुडाळ येथील शांत रम्य बागायती मधील कृषी पर्यटन केंद्र कोकण हेरीटेज यांचे प्रशस्त वातानुकलीत रिसॉर्ट,स्नेहपूर्ण आदरातिथ्य यामुळे सर्व मित्र मैत्रिणी समाधान व्यक्त करीत आपल्या अतूट ४२ वर्षाच्या मैत्रीचा आनंद व्यक्त करून ४३ वर्षाच्या स्नेहमेळाव्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देत निरोप घेतला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *