देवगड (प्रतिनिधी)
महाशिवरात्री यात्राउत्सव नंतर कुणकेश्वर मंदिर परिसराची डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, तर्फे केली स्वच्छता
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांनी आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.वाढत्या प्रदूषणाला आळा घालुन पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करून ऐतिहासिक वारसा जपणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी आदरणीय डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली श्री बैठकीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरण पूरक असे विविध उपक्रम जिल्हा, राज्य तसेच देशपातळीवर राबविले जातात. यापैकीच स्वच्छता अभियान उपक्रमा अंतर्गत प्रतिष्ठान तर्फे दिनांक ०२/०३/२०२५ रोजी सकाळी ८.३० ते १२. १० या वेळेत संपूर्ण देवगड तालुक्यातील श्रीबैठकी मधील ४२१ श्रीसदस्यांनी एकत्र येऊन कुणकेश्वर मंदिर व परीसर स्वच्छता अभियान राबविले .
या कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यातील ५ श्री बैठकांनी ( जामसंडे, वाडा, मुटाट, दहिबाव, शिरगांव ) सहभाग घेतला होता. या उपक्रमा दरम्यान मा. तहसीलदार देवगड श्री. रमेश पवार, माजी आमदार मा. अजित गोगटे, देवगड पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश देसाई, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. एकनाथ तेली, मा. सरपंच कुणकेश्वर श्री. महेश ताम्हणकर, माजी सरपंच श्री. घाडी आणि प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी, तसेच स्थानिक ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
या स्वछता अभियानाअंतर्गत ओला कचरा ६,२१० किलो व सुका कचरा ९,१२० किलो एकूण १५,३३० किलो कचरा जमा करण्यात आला.
