प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी व उपकेंद्र सांगुळवाडी यांच्यावतीने नावळे येथे महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर
प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी व उपकेंद्र सांगुळवाडी यांच्यावतीने नावळे गावातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर ग्रामपंचायत कार्यालय नावळे येथे संपन्न झाले. या आरोग्य शिबिराला उपकेंद्र सांगुळवाडीच्या सी एच ओ डॉ ज्योत्स्ना पाटील यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सोनल गुरव, आरोग्य सेविका गोसावी अशा सेविका सौ साक्षी शेळके, मदतनीस श्रीमती रावराणे, माजी सरपंच सुवर्णा सावंत आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.