वैभववाडीतील ३४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी उद्या पुन्हा आरक्षण सोडत
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच पदासाठी पुन्हा आरक्षण पडणार आहे वैभववाडी तालुक्यातील 34 ग्रामपंचायती साठी 15 जुलै रोजी आरक्षण टाकण्यात येणार आहे. वैभववाडी तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची सन 2025 ते 2030 या कालावधीसाठीची आरक्षण सोडत मंगळवार दि. 15 जुलै रोजी वैभववाडी तहसिलदार कार्यालयात सकाळी 11 वा. होणार आहे. तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गासाठी असणार असून त्यात 1 संबंधित प्रवर्गासाठी व 2 महिलांसाठी आरक्षणीत असणार आहे.
नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी 9 पदे आरक्षीत होणार असून त्यात 4 प्रवर्गासाठी व महिलांसाठी 5 जागा असणार आहेत. तर उर्वरीत 22 सरपंच पदे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार असून त्यात 11 पदे ही सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षीत होणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी जि.प., पं.स. सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार सूर्यकांत पाटील केले आहे.