सिक्कीम हिमाचल प्रदेश मध्ये बदली केलेल्या सिंधु पुत्रांच्या मदतीसाठी धावले भाजपा आम.नितेश राणे
थेट कंपनी एचआरला फोन लावत राणेंनी सुनावले खडेबोलः काळजी करू नका, निश्चिंत रहा; राणेंचा शब्द..
गोव्यातील सिप्ला कंपनीकडून तडकाफडकी हिमाचल प्रदेश, सिक्कीम येथे बदली केलेल्या सिंधुपुत्रांच्या मदतीसाठी भाजप नेते, आ. नितेश राणे धावून आले. थेट कंपनी एचआरला फोन लावत राणेंनी खडेबोल सुनावले आहेत. यावेळी वरिष्ठांशी बोलून तातडीनं तोडगा काढण्याच्या सुचना त्यांनी कंपनी एचआरला केल्यात. तसेच सिंधुदुर्गच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही. काळजी करू नका, निश्चिंत रहा असा शब्द उपस्थित सिंधुदुर्गच्या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना नितेश राणेंनी दिला.
सिक्कीम, हिमाचल प्रदेश येथे बदली केलेल्या सिंधुपुत्रांनी आज कणकवली येथे भाजप नेते आमदार नितेश राणे यांची भेट घेतली.
एस्मा कायद्याचा गैरवापर करून आमची बदली सिक्कीम येथे बदली केली आहे.गोवा येथील आस्थापनात गेली अनेक वर्षे आम्ही काम करत आहोत. अनेक कामगारांची कुटुंब सोबत आहेत. मुलांच शिक्षण सुरू आहे. अशावेळी हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम येथील आस्थापनात रुजू होणे शक्य नाही. याची व्यवस्थापनाला कल्पना दिली असता कंपनी व्यवस्थापन सुडबुद्धीने आमच्याशी वागत आहे. रूजू न झाल्यास नोकरी सोडावी लागणार आहे. यामुळे उपासमारीची वेळ आमच्यासह कुटुंबावर येणार असल्याची कैफियत सिप्ला कंपनीच्या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी आ. राणेंसमोर मांडली.