प्रकाशनाची अनोखी संकल्पना ; “टोपीवाले फुगे” पुस्तकाचे धावत्या ट्रेनमध्ये प्रकाशन 

0 minutes, 2 seconds Read

प्रकाशनाची अनोखी संकल्पना ; “टोपीवाले फुगे ” पुस्तकाचे धावत्या ट्रेनमध्ये प्रकाशन 

 

नवी मुंबई (प्रदीप बडदे) १ ऑगस्ट २०२४

 

टोपीवाले फुगे’ या कवी विजय जोशी (विजो), डोंबिवली यांच्या बालकविता संग्रहाचे धावत्या ट्रेनमध्ये प्रकाशन करण्याची अनोखी आणि आगळीवेगळी संकल्पना राबविण्यात आली.

विजो यांच्या ट्रेनमधील मित्रांनी नोकरी निमित्ताने जाणाऱ्या, डोबिवली येथून सुटणाऱ्या त्यांच्या नेहमीच्या ट्रेनच्या डब्यामध्ये रंगीबेरंगी फुगे फुगवून लावले होते. संग्रहाच्या मुखपृष्ठाची पोस्टर्स लावण्यात आली होती. सर्वांनी टोप्या परिधान केल्या होत्या. आणि ट्रेन सुरू होताच ट्रेनमधील मित्रांच्या हस्तेच या बालकविता संग्रहाचे धावत्या ट्रेनमध्ये प्रकाशन करण्यात आलं. ‘टोपीवाले फुगे’ या नावाला साजेसा असा प्रकाशन सोहळा संपन्न केला.

धावत्या ट्रेनमधील या अनोख्या प्रकाशन सोहळ्याबद्दल कवी विजो यांनी या सर्व मित्रपरिवाराचे कौतुक आणि आभार व्यक्त केले आहेत. तसेच कवी विजो आणि ‘टोपीवाले फुगे’ या बालसंग्रहाचे साहित्य क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *