शिरगांवच्या पुं.अं. कर्ले महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार  ; मुंबई येथे चौथ्या वर्धापनदिन सोहळ्यात गौरविले

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

 

शिरगांवच्या पुं.अं. कर्ले महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार  ; मुंबई येथे चौथ्या वर्धापनदिन सोहळ्यात गौरविले

 

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांत देवगड तालुक्यातील पुंडलीक अंबाजी कर्ले कला-वाणिज्य महाविद्यालयाने चार पुरस्कार पटकावून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

करीअर कट्टाचा चौथा वर्धापनदिन सोहळा २५ फेब्रुवारी रोजी मुंबई येथिल यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला यानिमित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व एक दिवशीय कार्यशाळा २०२५ चे आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात शिरगांवच्या पुंडलीक अंबाजी कर्ले कला-वाणिज्य महाविद्यालयाला चार पुरस्कार मिळाले असुन यात उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक पुरस्कार व्दितीय क्रमांक महाविद्यालयाच्या करीअर कट्टा समन्वयक प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांना मिळाला असुन त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयास उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय उत्तेजनार्थ क्रमांकांस सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच डॉक्युमेंटरी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यस्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कार तर मुंबई विभाग उत्कृष्ठ विभागीय डॉक्युमेंटरी म्हणून तृतीय क्रमांक पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन उपस्थित मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, उद्योगमंत्री नामदार उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण विभाग राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

महाविद्यालयाने मिळविलेल्या यशाबद्दल शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, संस्था पदाधिकारी व संचालक मंडळ, प्राचार्य समीर तारी यांनी अभिनंदन केले यावेळी महाविद्यालयाच्या करीअर कट्टा समन्वयक प्राध्यापिका अक्षता मोंडकर, प्राध्यापिका सिद्धी कदम, प्राध्यापिका कोमल पाटील, प्राध्यापिका सोनाली ताम्हणकर, प्राध्यापिका मयूरी कुंभार तसेच करीअर कट्टाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *