…. तर २६ जानेवारीला नगरपंचायत आवारात कुटुंबियासमवेत उपोषणाला बसण्याचा मयुरेश गोखलेंनी दिला इशारा

 

देवगड (प्रतिनिधी)

.…. तर २६ जानेवारीला नगरपंचायत आवारात कुटुंबियासमवेत उपोषणाला बसण्याचा मयुरेश गोखलेंनी दिला इशारा

देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील खालची बाजारपेठ येथील संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना घरासमोर टाकलेली दगड व माती वर्ष होत आले तरीही नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही न घेतल्याने २६ जानेवारी रोजी कुटुंबीयांसोबत नगरपंचायत आवारात उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे मयुरेश गोखले यांनी दिला आहे .

त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,फेब्रुवारी महिन्यात नगरपंचायत मार्फत माझ्या घरासमोर संरक्षक भिंतीचे काम झाले होते.त्यातून निघालेली दगड-माती माझ्या घराच्या आवारात टाकली होती.आता जवळपास एक वर्ष होत आले, तरीही संबंधित ठेकेदाराने ही दगड-माती अद्याप उचललेली नाही.

आता यापुढे ही दगड-माती जबाबदारीने कोणी उचलेल असे मला वाटत नाही. तरी या अर्जाद्वारे मी आपणास
कळवू इच्छितो की, २५ जानेवारी २०२५ पर्यंत वाट पाहून दगड-माती उचलली न गेल्यास २६ जानेवारी २०२५ रोजी नगरपंचायत आवारात मी माझ्या कुटुंबासमवेत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मयुरेश गोखले यांनी दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *