.…. तर २६ जानेवारीला नगरपंचायत आवारात कुटुंबियासमवेत उपोषणाला बसण्याचा मयुरेश गोखलेंनी दिला इशारा
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील खालची बाजारपेठ येथील संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना घरासमोर टाकलेली दगड व माती वर्ष होत आले तरीही नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही न घेतल्याने२६ जानेवारी रोजी कुटुंबीयांसोबत नगरपंचायत आवारात उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे मयुरेश गोखले यांनी दिला आहे .
त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,फेब्रुवारी महिन्यात नगरपंचायत मार्फत माझ्या घरासमोर संरक्षक भिंतीचे काम झाले होते.त्यातून निघालेली दगड-माती माझ्या घराच्या आवारात टाकली होती.आता जवळपास एक वर्ष होत आले, तरीही संबंधित ठेकेदाराने ही दगड-माती अद्याप उचललेली नाही.
आता यापुढे ही दगड-माती जबाबदारीने कोणी उचलेल असे मला वाटत नाही. तरी या अर्जाद्वारे मी आपणास कळवू इच्छितो की, २५ जानेवारी २०२५ पर्यंत वाट पाहून दगड-माती उचलली न गेल्यास २६ जानेवारी २०२५ रोजी नगरपंचायत आवारात मी माझ्या कुटुंबासमवेत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मयुरेश गोखले यांनीदिला आहे.