एस. एच. केळकर कॉलेज देवगड शिक्षकेतर कर्मचारी संघ विजेता

0 minutes, 3 seconds Read

देवगड (प्रतिनिधी)

एस. एच. केळकर कॉलेज देवगड शिक्षकेतर कर्मचारी संघ विजेता

 

 

अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी (सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा – शिक्षण विकास मंडळ देवगड संचलित श्री. एस. एच. केळकर कॉलेज देवगड शिक्षकेतर कर्मचारी संघ विजेता
ही क्रिकेट स्पर्धा कणकवली कॉलेजच्या मैदानावर आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला, संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ, कणकवली कॉलेज, स. का. पाटील महाविद्यालय मालवण, एस. पी. के. कॉलेज सावंतवाडी, आनंदीबाई रावराणे कॉलेज वैभववाडी, कला वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट, श्री. एस. एच. केळकर कॉलेज देवगड, लक्ष्मीबाई हळबे कॉलेज दोडामार्ग, गोगटे वाळके कॉलेज पानवळ बांदा ईत्यादी जिल्ह्यातील एकूण दहा संघ सहभागी झाले होते.

 

 

उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या कामगिरीमुळे केळकर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी संघाने फायनल पर्यंत मजल मारली. देवगड कॉलेजचा पहिला सामना लक्ष्मीबाई हळबे कॉलेज दोडामार्ग बरोबर होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना देवगड संघाने तीन षटकांत 29 धावांच लक्ष ठेवले होते परंतु पहिल्या षटकात दोडामार्ग कॉलेजने 13 धावा काढत सामना पूर्णपणे एकतर्फी झालेला असताना दुसऱ्या षटकात उत्कृष्ट झेल घेत अनिकेत कोयंडे याने सामना देवगड महाविद्यालयाच्या बाजूने वळवला . शेवटच्या षटकात 11 धावांची गरज असताना योगेश राणे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत फक्त 2 धावा देवून 2 विकेट घेऊन सामना जिंकून दिला. त्यामुळे सामनावीर म्हणून त्यांना गौरविण्यात आले. त्यांनतर उपांत्यपूर्व सामना वैभववाडी संघासोबत होता या तीन षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर अनिकेत तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्यानादात झेल बाद झाला व पहिल्या षटकात फक्त 4 धावा असताना हर्षल सावंत व प्रशांत तेली यांनी सामन्याची जबाबदारी घेऊन पुढील 2 षटकात 34 धावा करून वैभववाडी संघाला 38 धावांचे खडतर आव्हान ठेवले होते त्यामूळे 21 धावा जमवलेल्या हर्षल सावंत याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

 

 

त्यांनतर सेमीफायनलसाठी यजमान कणकवली संघ असताना. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना देवगड महाविद्यालय संघाने 4 षटकांत जिंकण्यासाठी फक्त 35 धावांचे आव्हान कणकवली कॉलेज कडे ठेवले होते. क्षेत्ररक्षण व गोलंदाजी यांच्यावर सामन्याची मदार होती. पहील्याच षटकात कणकवलीचा डावखुरा खेळाडू याने मारलेल्या उतुंग षटकारला रोखत प्रशांत तेली यांनी सीमेवरती उत्कृष्ट झेल घेत सामना पूर्णपणे देवगड कॉलेजच्या बाजूने फिरवला. कणकवली कॉलेजला चार षटकांत अवघ्या 24 धावांवर रोखण्यात यश मिळाले आणि फायनल मध्ये प्रवेश मिळविला. या सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजी केल्याने व झेल घेतल्याने प्रशांत तेली यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

 

 

आता शेवटचा फायनल सामना कुडाळ कॉलेज यांच्या सोबत होता. या सामन्यात कुडाळ कॉलेजचा उत्कृष्ट खेळाडू दुसऱ्या चेंडूवर कैलास मसगे याने रोहन खेडेकर करवी झेलबाद केले. त्यांनतर देवगड कॉलेजच्या भेदक गोलंदाजीसमोर 4 षटकात 23 धावांवर रोखले आणि अवघ्या दोन षटकांत देवगड कॉलेजने आव्हान पूर्ण करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

 

देवगड कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचारी संघाने विजेतेपद पटकावून देवगड कॉलेजला रोख रक्कम 10000 रुपये आणि एक चषक मिळवून दिले. श्री. प्रशांत तेली यांना उत्कृष्ट गोलंदाजी म्हणून सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि अंतिम सामनावीर म्हणून गौरविण्यात आले या सर्व कर्मचाऱ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *