{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"border":2,"transform":2,"effects":1,"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

आईकडे दुर्लक्ष करीत असल्याने दोन बहिणींनी भावाला दांड्याने मारहाण करून भावजयवर केला चाकूहल्ला ; पोंभुर्ले येथील घटना

 

देवगड (प्रतिनिधी)

 

आईकडे दुर्लक्ष करीत असल्याने दोन बहिणींनी भावाला दांड्याने मारहाण करून भावजयवर केला चाकूहल्ला ; पोंभुर्ले येथील घटना

 

 

दोन्ही बहिणींवर विजयदूर्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

        आजारपणात आपल्याकडे लक्ष देत नाही अशी तक्रार आईने मुलींकडे केल्यावर भाऊ बहिणी व भावजय यांच्यात वाद होवून नणंदेने भावजयवर चाकुहल्ला केल्याची घटना पोंभुले साखरवाडी येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आई डायबेटीसने आजारी असल्याने तिच्या मुली मनस्वी मंगेश इंगळे(३८) रा.मुंबई विलेपार्ले व मयुरी मंगेश बामगुडे(३७) रा.ठाणे पोंभुले साखरवाडी येथे माहेरी आल्या होत्या.मात्र आईने मी आजारी असताना मुलगा अनंत लक्ष देत नाही अशी तक्रार मुलींकडे केली.याबाबत दोन्हीही बहिणींनी भावाकडे विचारणा केली.या दरम्यान झालेल्या बोलाचालीचे रूपांतर वादात झाले.यावेळी मनस्वी हिने आई आधारासाठी वापरत असलेला दांडा घेवून भावाच्या पायावर मारला तर मयुरी हिने भावजय अस्मिता हिचे तोंड दाबुन पर्समधील चाकू काढून तिच्या गळ्यावर वार केला.ही घटना पोंभुर्ले साखरवाडी येथे १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली.

याप्रकरणी अस्मिता अनंत कुडतुडकर(३३) हिने दिलेल्या तक्रारीवरून विजयदूर्ग पोलिसांनी मनस्वी इंगळे व मयुरी बामगुडे या दोन बहिणींविरूध्द भारतीय न्यायसंहिता ११८(२), ११८(१), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा तपास विजयदूर्ग पोलिस निरिक्षक मनोज सोनवलकर करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *