देवगड पोयरे येथील उ.बा.ठा शिवसेनेची पूजा नरेश मयेकर – महिला संघटक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षामध्ये प्रवेश केला.
पूजा नरेश मयेकर (उबाठा शिवसेना महिला संघटक, पोयरे),व नरेश तुळशीदास मयेकर, आणि संदीप सुरेश मुणगेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात शनिवारी प्रवेश केला.
आमदार नितेश राणे यांचे काम, कार्यपद्धती आणि विकासाची दृष्टी असल्याने आपण हा प्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेश कर्त्यानी सागितले.यावेळी त्यांनी उबाठा संघटनेवर टीका करत म्हटले की, “उबाठा शिवसेनेमध्ये आश्वासनाशिवाय काहीही मिळत नाही.”
या प्रसंगी माजी सरपंच संदीप घाडी, माजी उपसरपंच भरत राणे, विकास मेस्त्री, संतोष घाडी, विद्यमान उपसरपंच समीर तावडे, आणि अनिल रुपये आदी मान्यवर उपस्थित होते.