देवगड प्रतिनिधी
दीक्षित फाउंडेशन यांच्यावतीने श्रीदेव गणपती मंदिर हुर्शी गडदेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृहाचा लोकार्पन सोहळा नुकताच संपन्न
कै.निळकंठ श्रीधर तथा बाळसाहेब दिक्षित यांच्या स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन यांच्यावतीने श्रीदेव गणपती मंदिर हुर्शी गडदेवाडी येथे सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले याचा लोकार्पन सोहळा नुकताच निळकंठ ऊर्फ महेश मराठे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे,दीक्षित फाउंडेशनचे सर्वेसर्वा निरंजन दीक्षित, प्रकाश करंदीकर गुरुजी माजी पंचायत समिती उपसभापती रविंद्र तिर्लोटकर, पुरळ सरपंच अनुश्री तावडे, उपसरपंच अनिल पुरळकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश देवळेकर, बाळुकाका ईनामदार, मुकुंद करंदिकर, देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगरसेविका आदया गुमास्ते, संजीवनी फडके, भुषण बोडस आदी उपस्थित होते.
ऐतिहासिक श्रीदेव गणपती मंदिर हुर्शी गडदेवाडी हे मंदिर असून या मंदिर परिसरात सुलभ शौचालयाची गरज लक्षात घेवून दीक्षित फाउंडेशनचे सर्वेसर्वा निरंजन दीक्षित यांनी या ठिकाणी स्वखर्चातून दीक्षित फाउंडशेनच्यावतीने सुलभ शौचालय उभारले आहेत. या शौचालयाला लागणारी जागा विनामुल्य निळकंठ मराठे यांनी उपलबध करुन दिली आहे. दीक्षित फाउंडेशनच्यावतीने देवगड तालुक्यात शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये अनेक विकासात्मक कामे केली गेली आहेत. हुर्शी गडदेवाडी ग्रामस्थांच्यावतीने सुलभ शौचालय उपलब्ध करुन दिल्याबददल जागामालक मराठे व निरंजन दीक्षित यांचे कौतुक करण्यात आले.
