मृत्यूपश्चात वीणा ब्रम्हदंडे यांचे अवयवदान

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

मृत्यूपश्चात वीणा ब्रम्हदंडे यांचे अवयवदान

खारेपाटण येथील वीणा ब्रम्हदंडे (54) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांना अवयवदानाचा
निर्णय घेतला. खारेपाटणमधील ब्रम्हदंडे कुटुंबीय देवदर्शनासाठी निघत असतानाच वीणा या चक्कर येऊन पडल्या. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती त्यांच्या मेंदूला जोरदार आघात झाल्याने त्यांचा मेंदू डॅमेज झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचवेळी डाॅक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना अवयवदानाचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाला निर्णय घेतला. कोल्हापूर येथील आधार अष्टर रुग्णालयात वीणा यांच्या मृतपश्चात अवयवदानाची प्रक्रिया डाॅक्टरांनी पूर्ण केली. दान केलेले अवयव 5 जणांना देण्यात आले. खारेपाटण दशक्रोशीतील ही पहिलीच घटना आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *