रत्नागिरीत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा आज “भक्ती उत्सव”

सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग ;भक्ती उत्सव कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन   कणकवली (प्रतिनिधी)   महाराष्ट्रातील कोकणमधील रत्नागिरी जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी जागतिक शांततेचे दूत गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा भक्ती उत्सव कार्यक्रम होणार आहे. या भक्ती उत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री श्री रविशंकर सुदर्शन क्रियेतून मनशांतीतून तणाव मुक्तीचा मार्ग यावर […]

कणकवली तालुक्यातील ८ जि. प. जागांसाठी ३७ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६० उमेदवारांनी दाखल केले अर्ज

  कणकवली (प्रतिनिधी)   जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कणकवली तालुक्यात भाजपला बंडखोरीची फटका बसला आहे . नाटळ, हरकुळ खुर्द, फोंडाघाट या तिन्हा जिल्हा परिषद मतदारसंघात तर कलमठ, खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघातही भाजप अंतर्गत बंडखोरी उफाळली आहे. भाजपचे माजी कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, फोंडघाटचे राजन चिके, सुरेश सावंत, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत […]

देवगडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी गर्दी ; भाजपच्यावतीने सर्वाधिक १८ अर्ज दाखल

देवगड : प्रतिनिधी   देवगड मध्ये शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. भाजपाच्यावतीने सर्वाधिक १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापाठोपाठ ठाकरे शिवसेनेतर्फे १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आहेत.मनसेच्यावतीने दोन तर काँग्रेसच्यावतीने तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.बंडखोरीचा फटका भाजपा पक्षाला बसला असून भाजपाच्यावतीने पाचजणांनी बंडखोरी केली आहे.मात्र […]

वैभववाडीत जि. प. साठी 15 तर पं. स. साठी 26 अर्ज दाखल

वैभववाडीत जि. प. साठी 15 तर पं. स. साठी 26 अर्ज दाखल   वैभववाडी (प्रतिनिधी)   जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी वैभववाडी तालुक्यात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या 3 जागांसाठी 15 अर्ज तर पंचायत समितीच्या 6 जागांसाठी 26 अर्ज दाखल झाले आहेत. कोळपे जि. प. मधून सर्वाधिक नऊ अर्ज दाखल झाले आहेत. […]

युवा लढणार , परिवर्तन घडवणार . . .

युवा लढणार , परिवर्तन घडवणार . . . वैभववाडी (प्रतिनीधी) पंचायत समिती लोरे या मतदार संघातून आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार उच्चशिक्षित सिद्धेश(बंटी) दिलीप रावराणे यांनी अर्ज दाखल केला . या वेळी लोरे मतदार संघातील आचिर्णे, घाणेगडवाडी,अरुळे, निमअरुळे ,कुर्ली ,लोरे आणि गडमठ या गावामधील कार्यकरते मोठ्या संख्येनेउपस्थित होते .

युवा लढणार ,परिवर्तन घडवणार . . .

  वैभववाडी (प्रतिनीधी ) लोरे पंचायत समिती निवडणूकिसाठी आज दिनांक २०/१/२०२६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अक्षय अनिल बागवे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला . यावेळी लोरे, आचिर्णे , कुर्ली , घाणेगडवाडी , अरुळे , निमअरुळे ,गडमठ गावातील कार्यकर्ते उपस्थित होते

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३८ वा व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा ३१ रोजी तर १ फेब्रुवारीला फिश फूड अँड फन फेस्टिवल

  देवगड व्यापारी संघाचे पुरस्कार पर्यटन उद्योजक श्रीकांत जोईल वैष्णवी जोईल व आदर्श व्यापारी शेतकरी पुरस्कार प्रसन्न गोगटे यांना जाहीर जिल्हा व्यापारी संघाचे पुरस्कार जाहीर जीवनगौरव पुरस्कार देवगड मधील राजाराम कदम,महिला उद्योजक पुरस्कार सुषमा देसाई, युवा उद्योजक विजय कदम,विशेष उपक्रमशील पर्यटन व्यावसायिक पुरस्कार कोकणी राणमाणूस प्रसाद गावडे यांना देवगड | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा […]

स्थानिक उमेदवार नाकारल्याने भाजपा पदाधिकारी आक्रमक ; पार्सल उमेदवार नको घोषणांनी पडेल दणाणले

  पडेल येथे भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन १०० पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी   सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)   जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकी महायुतीची घोषणा झाली जागावाटप झाले देवगड तालुक्यात पुरळ जिल्हा परिषद मतदार संघाची आरक्षण खुला प्रवर्गासाठी असल्याने या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे. मात्र अशातच जिल्हा परिषद पुरळ मतदार संघाची उमेदवारी मंत्री महोदयांच्या खास […]

युनेस्कोच्या यादीतील बारा किल्ले धावत जाण्याचा युवतीचा निर्धार; आस्मा कुरणे हिचे देवगडवासियांकडून उस्फूर्त स्वागत

देवगड (प्रतिनिधी)   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर ते रायगड असे तब्बल ३०० किलोमीटर अंतर धावत पार करणाऱ्या कोल्हापूरच्या रणरागिणी धावपटू आस्मा कुरणे हिचे देवगड येथे सोमवारी उस्फूर्त स्वागत करण्यात आले. देवगड तालुका व्यापारी संस्था तसेच देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण सावंत यांच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला. […]

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका : शिंदे  शिवसेनेचे उमेदवार जाहीर ; एबी फॉर्मचे वाटप

  देवगड (प्रतिनिधी)   जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने कणकवली विधानसभा मतदारसंघातील जि प व पं स निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून स्थानिक पातळीवर सक्षम व कार्यकर्त्यांमध्ये विश्वास असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे […]