सिंधुदुर्गात मतदानापूर्वीच महायुतीचा ‘धडाका’ ; ना. नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात ११ उमेदवार बिनविरोध

  ५ जिल्हापरिषद आणि ६ पंचायत समिती सदस्य झाले बिनविरोध   कणकवली (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आपली राजकीय पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच मोठा धमाका केला असून, जिल्ह्यातील एकूण ११ जागांवर महायुतीचे […]

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का ; वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात

पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का ; वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात   भाजपा प्रवेशाने वैभववाडीतील मनसे बनली खेळखिळी ! नामदार नितेश राणेंनी सर्वांचे पक्षात केले स्वागत   वैभववाडी (प्रतिनिधी )   वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्ह्याचे […]

कट्टा महाविद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न

  मालवण (प्रतिनिधी)   कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टाच्या क्रिडा विभागाच्या वतीने महाविद्यालयीन क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा चे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टाचे क्रिडा शिक्षक संदीप गोळवणकर महाविद्यालयाचे […]

समाजसेवा हाच राणेसाहेबांचा खरा संस्कार – नाम.नितेश राणे ; कणकवलीत ‘खाऊगल्ली २०२६’ उत्साहात

कणकवली (प्रतिनिधी)   राजकारण आणि निवडणुका येत-जात राहतात, पण जनतेची सेवा करणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. पालकमंत्री नाम. नितेश राणे आणि माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखालील टीम ‘खास. नारायण राणे यांच्या’ संस्कारांतून घडलेली असून, पद असो वा नसो, जनतेची सेवा हीच आमची ओळख आहे, असे प्रतिपादन […]

ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची गोपूरी आश्रमास सदिच्छा भेट ; गोपुरी आश्रमाच्या सामाजिक कामाबद्दल व्यक्त केले समाधान

कणकवली (प्रतिनिधी)   ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी आज गोपुरी आश्रमाला आवर्जून भेट देऊन गोपुरी आश्रमाच्या सामाजिक कामाची माहिती घेतली. गोपूरी आश्रमाच्या माध्यमातून सध्या जे उपक्रम सुरू आहेत त्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून, सामाजिक संस्थांना समाजाने आर्थिक पाठबळ दिल्यास सामाजिक संस्था प्रभावीपणे ‘माणूस’ घडवण्याचे काम करू शकतील असे […]

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न ; महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

  नवी दिल्ली | देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री. राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक झाली . या बैठकीला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे उपस्थित होते. त्यांनी या बैठकीत […]

हळवल मधील तो बॅनर ठरतोय सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर जोरदार चर्चा कणकवली (प्रतिनिधी) कणकवलीतील मतदारांना पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून तालुक्यातील ग्रामीण मतदारांकडून अपेक्षा वाढली कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत लक्ष्मी दर्शनाचा मुद्दा भरपूरच चर्चेत आला होता. या निवडणुकीत कणकवलीतील काही प्रभागांमध्ये 10, 15, 25, 30 हजारापर्यंत ची रक्कम वाटप झाल्याचे बोलले जात होते. अशाप्रकारे पैसे वाटपाला जरी पुरावा नसला […]

कणकवलीत माघी गणेशोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या भेटी ; गणरायाचे घेतले दर्शन

  कणकवली (प्रतिनिधी)   माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातील कनेडी, कणकवली, असलदे व आयनल येथील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्व नागरिकांना सुख, समाधान, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना केली. पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या […]

कणकवलीत अर्ज छाननीअंती तीन अर्ज अवैध… ; उर्वरित ९१ उमेदवारांचे ९१ अर्ज वैध; बिडवाडी पंचायत समिती भाजपसाठी बिनविरोध…

  कणकवली (प्रतिनिधी)   जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अर्ज छाननी प्रक्रिया आज कणकवली तहसील कार्यालयात पार पडली. या छाननीदरम्यान ३ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. यात बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघ भाजपसाठी बिनविरोध ठरला आहे. तालुक्यात ३ ठिकाणी एकाच उमेदवाराने प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने नियमांनुसार त्यातील एक […]

मालवण येथे आयोजित आरती स्पर्धेत बाळ गोपाळ मंडळ आचरा प्रथम

  आचरा–अर्जुन बापर्डेकर जय गणेश मंदिर मेढा मालवण येथे आयोजित श्री गणेश आरती स्पर्धेत आचरा येथील बाळ गोपाळ मंडळ आचरा यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक श्री रामेश्वर ग्रुप आचरा यांना गौरविण्यात आले.यशस्वी संघांना रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यशस्वी दोन्ही संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे