कट्टा महाविद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न

0 minutes, 0 seconds Read

 

मालवण (प्रतिनिधी)

 

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टाच्या क्रिडा विभागाच्या वतीने महाविद्यालयीन क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा चे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टाचे क्रिडा शिक्षक संदीप गोळवणकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रविंद्र गावडे महाविद्यालय क्रिडा प्रमुख महेंद्र कविटकर, क्रीडा सहाय्यक वैशाली पालव उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना खेळांचे महत्व विषद करताना सर्व खेळाडूंनी संघभावनेने खेळावे असे आवाहन उद्घाटक श्रुषिकेश नाईक यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

वैयक्तिक क्रिडा प्रकारात गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, १०० मीटर व २०० मीटर धावणे तर सांघिक क्रिडा प्रकारात खोखो, कबड्डी, व्हॉलिबॉल,रस्सीखेच इत्यादी क्रिडाप्रकारांचे आयोजन करण्यात आले होते.
क्रिडा महोत्सवात सांघिक आणि वैयक्तिक पातळीवर सर्वच विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य आणि कुशलता पणास लावत उत्कृष्ट खेळांचे प्रदर्शन केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *