कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत यांचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र

  भाजप की शिंदे शिवसेना आज निर्णय होणार…   कणकवली (प्रतिनिधी ) कणकवली विधानसभा मतदार संघाचे प्रमुख आणि ठाकरे शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी शिवसेना पक्षाला आज जय महाराष्ट्र केला. ठाकरे शिवसेनेच्या सर्व पदांचा आपण राजीनामा देत आहोत. आपण आणि आपल्या सोबतचे कार्यकर्ते लवकरच सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार आहोत असे श्री सावंत यांनी आपल्या निवासस्थानी […]

कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा ; हजारोंच्या संख्येने होणार महा प्रचारसभा

  कणकवली (प्रतिनिधी)   कणकवली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य स्टेजही उभारण्यात येत आहे.   या जाहिर प्रचार सभेला मुख्यमंत्र्यांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र […]

आशियेमठ श्री दत्तक्षेत्र येथे अतिरुद्र स्वाहाकाराने भक्तिमय वातावरण

151 ब्राम्हणांच्या सहभागाने होतोय अतिरुद्र स्वाहाकार ; उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत , पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती   कणकवली (प्रतिनिधी)   श्री दत्तक्षेत्र आशिये मठ येथे पुरातन श्री दत्तमंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘अतिरुद्र स्वाहाकार’ व धार्मिक कार्यक्रमांचा भक्तिमय वातावरणात रविवारी प्रारंभ झाला आहे. प्रारंभी प.पू. भालचंद्र महाराज ते […]

बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य महासत्ता होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया–अडव्होकेट सुभाष आचरेकर   कणकवली (प्रतिनिधी) भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. असे हे बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य भारत देश महासत्ता होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया.भारतीय संविधानाने घालून दिलेली मुल्ये आत्मसात करुन जतन करुया असे उद्गार धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे सचिव सुभाष आचरेकर यांनी न्यू […]

शिरवल फणस येथे डंपर पलटी होऊन अपघात ; अपघातात चालक जखमी : डंपरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) नरडवेहुन कणकवलीच्या दिशेने जाणारा डंपर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने शिरवल फणस येथील वळणावर पलटी होऊन अपघात घडला. हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समजते. अपघातात चालक जखमी झाला असून डंपरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.डंपर पलटी झाल्याने डंपर चालक केबिनमध्ये अडकला होता.   मात्र केबीनची काच फोडून तो बाहेर आल्याचे समजते.डंपर […]

महावितरणच्या कबुलीनंतर धीरज श्रीधर मेस्त्री यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

महावितरणच्या कबुलीनंतर धीरज श्रीधर मेस्त्री यांचे उपोषण तात्पुरते स्थगित   कणकवली (प्रतिनिधी)   कलमठ सुतारवाडी पिंपळपार येथील सभामंडपावरून जाणाऱ्या धोकादायक उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य धीरज श्रीधर मेस्त्री यांचे सुरू असलेले उपोषण महावितरण अधिकाऱ्यांच्या कबुलीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित काम येत्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण […]

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सिंधुदुर्गात ; भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती

  २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवली येथे जाहीर सभा   १ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ मध्ये सभा   कणकवली (तुळशीदास कुडतरकर) सिंधुदुर्गात ५ फेब्रुवारीला जि.प. व पं.स. निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. जिल्ह्यात खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जात […]

सावंतवाडी येथे रथसप्तमीनिमित्त १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर उत्साहात संपन्न

  कणकवली (प्रतिनिधी) रथसप्तमी अर्थात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्ग व घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे आज (दि. २५ जानेवारी २०२६) १०८ सूर्यनमस्कार संकल्प योगशिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. मन, शरीर आणि आत्मा यांचा संगम म्हणजे योग हा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या […]

कुपवडे येथे रात्री बिबट्याचे दर्शन; वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

  कणकवली (प्रतिनिधी)   कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   गावालगतच्या रस्त्यावर अचानक बिबट्या दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.   या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, तसेच परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी […]

राष्ट्रवादी कणकवली तालुका युवक अध्यक्ष नयन गावडे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला कणकवली मध्ये धक्का   कणकवली (तुळशीदास कुडतरकर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुका युवक अध्यक्ष नयन गावडे यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी धक्का मानला जात आहे.   वागदे गावातील काही ग्रामस्थांनी आज […]