जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सिंधुदुर्गात ; भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती

0 minutes, 2 seconds Read

 

२८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवली येथे जाहीर सभा

 

१ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ मध्ये सभा

 

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

सिंधुदुर्गात ५ फेब्रुवारीला जि.प. व पं.स. निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. जिल्ह्यात खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जात आहे. यापूर्वीच महायुतीच्या पाच जि.प. सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्ह्यात जनता आणि मतदारांचा वाढता पाठिंबा महायुतीला मिळत आहे.

 

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवार दि. २८ जानेवारी रोजी कणकवली येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. तसेच रविवार दि.१ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. महायुतीच्या वतीने या प्रचार सभांची तयारी सुरू आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीने प्रचारात वेग घेतला असून जनतेचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत आहे, अशी माहीती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सरचिटणीस तथा पावशी जि.प. मतदारसंघाचे उमेदवार दादा साईल यांनी आज पणदूर येथे दिली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *