देवगडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी गर्दी ; भाजपच्यावतीने सर्वाधिक १८ अर्ज दाखल

0 minutes, 5 seconds Read

देवगड : प्रतिनिधी

 

देवगड मध्ये शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. भाजपाच्यावतीने सर्वाधिक १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापाठोपाठ ठाकरे शिवसेनेतर्फे १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आहेत.मनसेच्यावतीने दोन तर काँग्रेसच्यावतीने तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.बंडखोरीचा फटका भाजपा पक्षाला बसला असून भाजपाच्यावतीने पाचजणांनी बंडखोरी केली आहे.मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवशी खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

या निवडणुकीमध्ये जि.प.व पं.स.साठी उमेदवारी अर्ज दाखल भाजपाचे उमेदवार पुढीलप्रमाणे-

जिल्हा परिषद उमेदवार- शिरगांव (अनुसूचित जाती – सर्वसाधारण) मतदारसंघातून देवदत्त दामोदर कदम, qकजवडे (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून सौ. सावी गंगाराम लोके, कुणकेश्वर (ना.मा.प्र.) मतदारसंघातून श्री. सुनिल बाळकृष्ण पारकर, पुरळ (सर्वसाधारण) मतदारसंघातून श्री. संजय नामदेव बोंबडी, पडेल (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून कु. सुयोगी रविंद्र घाडी, बापर्डे (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून सौ. अवनी अमोल तेली तसेच पोंभुर्ले (ना.मा.प्र. – महिला) मतदारसंघातून सौ. अनुराधा महेश नारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडून पुरळ (ना.म.प्र. – महिला) मतदारसंघातून सौ. संजना सत्यवान आळवे, तिर्लोट (सर्वसाधारण) मतदारसंघातून रविंद्र तिर्लोटकर, पडेल (सर्वसाधारण) मतदारसंघातून श्री. अंकुश यशवंत ठूकरुल तसेच नाडण (सर्वसाधारण) मतदारसंघातून गणेश सदाशिव राणे , बापर्डे (सर्वसाधारण महिला) संजना संजय लाड, फणसगाव (सर्वसाधारण महिला) समृध्दी संतोष चव्हाण, पोंभुर्ले(नामाप्र) सादिक जैनुद्दीन डोंगरकर, शिरगांव (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून सौ. शितल सुरेश तावडे, qकजवडे (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून सौ. स्नेहा श्रीकृष्ण अनभवणे, कोटकामते (ना.म.प्र. – महिला) मतदारसंघातून सौ. ऋतूजा राकेश खाजणवाडकर तसेच मुणगे (सर्वसाधारण) मतदारसंघातून श्री. सदाशिव पुरुषोत्तम ओगले यांनीही अर्ज दाखल केले आहेत.

महाविकास आघाडीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले.

ठाकरे शिवसेनेचे उमेदवार पुढीलप्रमाणे-

 

जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय

अभिषेक कदम (शिरगाव),गणेश गावकर (कुणकेश्वर),सुनील दत्त ाराम तेली (पुरळ),अंकिता सुहास वाडेकर (पडेल),दिपाली मनोहर मेस्त्री (पोंभुर्ले)

पंचायत समिती मतदारसंघनिहाय उमेदवार

सान्वी सुधाकर तिर्लोटकर (पुरळ), सुनील गणपत तिर्लोटकर (तिर्लोट),शशांक शरद तावडे (पडेल), सुहास वसंत वाडेकर (नाडण), सुलोचना सिताराम धुरी (बापर्डे), विष्णू बाबाजी घाडी (मणचे),व्यंकटेश जगन्नाथ नर (पोंभुर्ले),रोहिणी संतोष लाड (फणसगाव),मीरा मयुर सावंत (शिरगाव), प्रगती प्रदीप तेली (मुणगे),दीपक नारायण कदम (मुणगे), गणेश गोपाळ वाळके (कुणकेश्वर)

काँग्रेसच्यावतीने एक जि.प.साठी व एका पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.माजी सभापती रेश्मा सावंत यांनी काँग्रेसच्यावतीने किंजवडे जि.प.साठी व बापर्डे पं.स.मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मानसी मंगेश जाधव यांनी तळवडे पं.स.गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मनसेच्यावतीने एक जि.प.गटासाठी व एक पं.स.गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.यामध्ये रंजन सदानंद शिरगावकर यांनी शिरगाव जि.प.मतदारसंघातून व सौ.निकिता नारायण दाभोळकर यांनी qकजवडे पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.राष्टड्ढवादी काँग्रेसमार्फत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही.

उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यामध्ये तीन माजी सभापती, शिवसेनेचे दोन्हीही तालुकाप्रमुख, चार माजी जि.प.सदस्य, माजी पं.स.सदस्य तसेच तीन विद्यमान सरपंच यांचा समावेश आहे.बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवशी देवगड तहसिल कार्यालयात उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.देवगड तहसिल कार्यालयात तहसिलदार यांच्या दालनामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी नितीन राऊत यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.यावेळी सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा तहसिलदार आर.जे.पवार हे उपस्थित होते.उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळा खडपे, देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, महिला तालुकाध्यक्षा सौ.उष:कला केळूस्कर, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रqवद्र जोगल, युवक तालुकाप्रमुख गणेश गावकर, काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, प्रियांका साळसकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजपा शहरअध्यक्ष वैभव करंगुटकर, दयानंद पाटील, अ‍ॅड.प्रकाश बोडस,अ‍ॅड.प्रसाद करंदीकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *