स्थानिक उमेदवार नाकारल्याने भाजपा पदाधिकारी आक्रमक ; पार्सल उमेदवार नको घोषणांनी पडेल दणाणले

 

पडेल येथे भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन १०० पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी

 

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)

 

जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकी महायुतीची घोषणा झाली जागावाटप झाले देवगड तालुक्यात पुरळ जिल्हा परिषद मतदार संघाची आरक्षण खुला प्रवर्गासाठी असल्याने या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे. मात्र अशातच जिल्हा परिषद पुरळ मतदार संघाची उमेदवारी मंत्री महोदयांच्या खास मर्जीतील जिल्हाकारणीतील पदाधिकाऱ्यांची उमेदवारीवर वर्णी लागत असल्याचे वृत्त समजताच या मतदारसंघातील स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आक्रमक होत पार्सल उमेदवार नको अशा जोरदार घोषणाबाजी देत पडेल कॅन्टींग येथील भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

 

या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय बोंबडी, नासिर मुकादम यांच्यासह एकूण १०० जणांनी लेखी स्वरूपात सह्या करून आपली भूमिका नोंदवली आहे.सदर आंदोलनामागील कारण स्पष्ट करताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, सदर पदाधिकारी यांच्या भूमिकेबाबत व कार्यपद्धतीबाबत स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना व मतांना डावलले जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी हा निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त करण्यात आला.

 

दरम्यान, सामूहिक राजीनामा या संदर्भात पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर हे पडेल येथील भाजप कार्यालयात उपस्थित झाले होते. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखाने स्थानिक उमेदवार देण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांच्या या ठाम भूमिकेची दखल घेत बंड्या नारकर यांनी, कार्यकर्त्यांचा विचार करून आज संध्याकाळपर्यंत स्थानिक उमेदवाराची घोषणा केली जाईल, असे आश्वासन दिले आहे .

 

या आंदोलनामुळे पडेल परिसरात राजकीय वातावरण तापले असून, पुढील घडामोडींवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची काय भूमिका राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *