पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्यापकरणी अटकेत असलेल्या पतीची जामीनावर  मुक्तता

0 minutes, 1 second Read

 

 

देवगड (प्रतिनिधी)

पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्यापकरणी अटकेत असलेल्या पतीची जामीनावर  मुक्तता

चार तोळे सोने व मोटरसायकलच्या मागणीसाठी देवगड सातपायरी येथील सौ. साक्षी सागर अनभवणे हिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी तसेच तिच्या संमत्तीशिवाय एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात केल्याप्रकरणी तिचा पती सागर रामदास अनभवणे (३२) या संशयिताला जिल्हा सत्र न्यायालयाने ५० हजाराचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने ॲड. सिद्धेश माणगांवकर व ॲड. सौ. श्रुती सिद्धेश माणगांवकर यांनी काम पाहिले.

 

साक्षी हिचा देवगड- सातपायरी येथील संशयित सागर अनभवणे याच्याशी १६ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर पती सागर, सासरे रामदास अनभवणे, सासू रोहिणी अनभवणे हे संशयित तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तसेच साक्षी ही अडीच महिन्यांची गरोदर असताना तिच्या संमत्तीशिवाय संशयित पती सागर याने एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात केला होता. याबाबतची फिर्याद सौ. साक्षी हिने देवगड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संशयित पती, सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीनही संशयितांना अटक करून देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने संशयितांना ३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान, संशयितांपैकी सासरे रामदास अनभवणे व सासू रोहिणी या संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयाने यापूर्वी सशर्त जामीन मंजूर केला होता. गुरुवारी संशयित सागर अनभवणे यालाही जिल्हा सत्र न्यायालयाने ५० हजाराचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगाडे करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *