देवगड (प्रतिनिधी) आशा म्हणजे आरोग्याचा कणा – गटविकास अधिकारी वृक्षाली यादव जामसंडे येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे आशा दिन कार्यक्रम संपन्न आशा म्हणजे आरोग्याचा कणा असुन आशांनी आपल्या कामातुन आरोग्य विभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली असुन आशा स्वयंसेविका शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे महत्वाचे काम करत आहे. नागरिक […]
देवगड : प्रतिनिधी देवगड तालुका बौध्दजन सेवा संघाच्यावतीने बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती निर्धार रॅली देवगड तालुका बौध्दजन सेवा संघाच्यावतीने शुक्रवारी बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती निर्धार रॅली देवगड कॉलेज नाका येथून तहसिल कार्यालयावर काढण्यात आली.या रॅलीत बहुसंख्येने धम्म उपासक व समाजबांधव उपस्थित होते.बोधगया विहार येथिल महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करण्यात यावा व महाबोधी बुध्द विहार […]
वैभववाडी ( तुषार शिंगाडे ) पी एम श्री विद्यामंदीर वैभववाडी प्रशालेत विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न… पी एम श्री योजनेअंतर्गत पी एम श्री विद्यामंदिर वैभववाडी येथे श्री राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल सांगुळवाडी यांच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे […]
कणकवली (प्रतिनिधी) लायन्स इंटरनॅशनल,लायन्स क्लब ऑफ पुणे, आकुर्डी यांच्या माध्यमातून कनेडी प्रशालेतील २१ विद्यार्थीनींना सायकल प्रदान लायन्स इंटरनॅशनल, लायन्स क्लब ऑफ पुणे, आकुर्डी यांच्या माध्यमातून माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेतील २१ विद्यार्थीनींना मोफत सायकल प्रदान करण्यात आल्या. आपल माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या सायकल इतर गरजू विद्यार्थीनींना द्याव्यात असा लायन्स क्लब चा उद्येश आहे.या […]
कणकवली (प्रतिनिधी) अॅड. मेघना सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती भिरवंडे गावच्या सुकन्या आणि कणकवलीतील प्रतिथयश वकील मेघना देवू सावंत यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. मेघना सावंत या गेल्या 19 वर्षाहून अधिक काळ कणकवलीत वकील म्हणून कार्यरत आहेत. कणकवली तसेच जिल्हा न्यायालयात त्यांनी आपला वकीली व्यवसाय केला आहे. […]
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवू :- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन शाळेतील विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारा शिक्षक आनंदी असेल तरच तो आनंददायी शिक्षण देऊ शकेल त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.महाराष्ट्र राज्य प्राथमिक […]
कणकवली (प्रतिनिधी) कणकवली पंचायत समिती मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नागरिक सुविधा कक्षाची स्थापना जनतेला एकाच ठिकाणी सर्व विभागांच्या योजनांची माहिती मिळणार आणि प्रस्ताव सादर करता येणार नागरिक सुविधा कक्ष स्थापन करणारी ठरली जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात सर्व प्रशासकीय कार्यालयांत १०० दिवसांचा १० कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. […]
कणकवली (प्रतिनिधी) लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या, अन्यथा आंदोलन ! ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हासंघटक नीलम सावंत-पालव यांचा सरकारला इशारा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपयांवरून २१०० रुपये देणार, असे आश्वासन दिले होते. राज्यात आता महायुतीचे सरकार आल्याने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, तसे न […]
कणकवली (प्रतिनिधी) भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणेंचा राजीनामा घ्या ; युवा सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे पोलिसांच्या मार्फत दिले निवेदन मंत्री नितेश राणे हे वारंवार हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत असतात. नितेश राणे हे स्वतःच्या फायद्यासाठी अशी समाजामध्ये वाद निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत. आपले मंत्री पद टिकण्यासाठी व आपल्या वरिष्ठांना खुश […]
आचरा–अर्जुन बापर्डेकर वायंगणी येथील विकास कामांची उद्घाटने शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते संपन्न वायंगणी येथील खांबलवाडी ते सडयेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण,घाडीवाडी ते तोंडवळीफाटा रस्ता खडीकरण डांबरीकरण, वायंगणी ग्रामपंचायत येथे पेवरब्लाक बसवणे,घाडीवाडी येथील स्मशानशेड बांधणे आदी विकास कामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मालवण तालुका शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, […]
